शिरूर (हवेलीनामा ऑनलाइन) अखिल भारतीय मराठा महासंघ शिरूर तालुका व शहर कार्यकारिणी येथे पार पडलेल्या आजच्या बैठकीत जाहीर करण्यात आली.यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ प्रभारी पुणे जिल्हाध्यक्ष गुलाब गायकवाड, प्रभारी महिला जिल्हाध्यक्ष शोभना पाचंगे, प्रभारी युवक जिल्हाध्यक्ष अंकुश लांडे यासह आजी माजी पदाधिकारी व सभासद आदींच्या उपस्थितीत निवडीचा कार्यक्रम पार पडला.
तालुुक्याची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे प्रसिद्धी प्रमुख अनिल सोनवणे, अध्यक्ष प्रदीप उर्फ आबासाहेब सोनवणे, महिला अध्यक्षा शशिकला काळे, युवक अध्यक्ष गणेश सरोदे, युवक अध्यक्षा प्रियंका वाळके,
तर शिरूर शहर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे शहर अध्यक्ष अनिल डांगे, शहर महिला अध्यक्षा उर्मिला फलके, शहर युवक अध्यक्ष सचिन जाधव, युवक सरचिटणीस अनिरुद्ध राखुंडे, युवती अध्यक्ष पूजा पंदरकर यांची निवड करण्यात आली.
समाजातील तळागाळातील समाज बांधवांच्या विकासासाठी काम करणार असल्याचे नूतन तालुका अध्यक्ष प्रदीप उर्फ आबासाहेब सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *