पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) विदर्भातील अष्टविनायकापैकी पहिला समजला जातो तो नागपूरचा टेकडी गणेश. नागपूरकरांचे हे आराध्य दैवत आहे. रेल्वे स्थानकाला लागून सीतबर्डी टेकडीवर हे गणेशाचे मंदिर आहे. हे मंदिर टेकडीवर असल्याने त्याला टेकडीचा गणपती म्हणूनच तो ओळखला जातो.
पिंपळाच्या झाडाखाली गणेशाची शेंदूर चर्चित प्रतिमा पाहायला मिळते. नागपूर हे ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे शहर, प्राचीन काळापासून अगदी पुरातत्त्वीय संदर्भ आणि पुरावे नागपूरसंदर्भात उपलब्ध आहेत. स्वयंभू गणेशाची ही मूर्ती एका प्राचीन मंदिराच्या भग्न झालेल्या अवशेषांमध्ये मिळाली असे सांगितले जाते.
नागपूरचे भोसले राजे आणि ब्रिटिशांची लढाई ज्या ठिकाणी झाली, त्याच ठिकाणी हे गणपतीचे मंदिर आहे. सुरुवातीला मंदिर छोटेसे होते, आता त्याचा विकास झाला आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला असले, तरी मूर्ती उत्तराभिमुख आहे. गणपतीच्या मूर्तीच्या पाठीमागील भिंतीला लागून एक शिवलिंग आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगाच्या ठिकाणी नंदी बसवलेला दिसतो.मंदिराचा गाभारा म्हणजे एक मोठा हॉल असून त्यात मध्यावर झाड आणि त्याखाली गणपतीची मूर्ती आहे. सभोवती लोखंडी जाळी बसवलेली आहे. मुख्य गणपती जवळजवळ पाच फूट रुंद आणि तीन फूट उंच असून इथे फक्त गणेशाचे तोंडच दिसते. त्यालाच डोळे आणि गंध लावून पूजा केली जाते. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला असले तरी मूर्ती मात्र उत्तराभिमुख आहे. मोठे मंदिर, आजूबाजूला इतर लहान मोठी मंदिरे, मोठा दरवाजा, पिण्याच्या पाण्याची सोय, वाहनांसाठी पाìकग असे सर्व अद्ययावत सुविधांनी युक्त असे हे देवस्थान झाले आहे. गणपतीच्या मूर्तीच्या पाठीमागील िभतीला लागून एक शिविपडी आहे. या शिविपडीचे वैशिष्टय़ म्हणजे इथे शिविलगाच्या ठिकाणी नंदी बसवलेला दिसतो.
या मंदिराची लोकप्रियता खूपच मोठी आहे. पहाटे साडेचारपासून विविध पूजाविधी इथे सुरू होतात. मंगळवार आणि शनिवार हे भक्तांसाठी जास्त महत्त्वाचे दिवस समजले जातात. या दोन दिवशी इथे मोठय़ा प्रमाणावर गर्दी असते. मंदिर परिसर अत्यंत रमणीय असून वड, पिंपळ आदी विविध वृक्षांची इथे मोठय़ा प्रमाणावर दाटी दिसते. त्यामुळे इथे विविध जातींचे पक्षिगण पाहायला मिळतात. इथून थोडय़ाच अंतरावर दुसऱ्या एका टेकडीवर फौजी गणपती मंदिर असून या दोघांना भाऊ-भाऊ असे म्हटले जाते.
विदर्भातील अष्टविनायक
श्री विघ्नेश (आदासा) • चिंतामणी (कळंब) •सिद्धीविनायक (केळझर) • सर्वतोभद्र (पवनी) • वरदविनायक (भद्रावती) • भृशुंड (मेंढा) • अष्टदशभूज (रामटेक) •टेकडी गणपती (नागपूर)
(संकलन साभार :- पेंडसे गुरूजी)
