पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर एक अवजड वाहनास पाठीमागून कन्टेनर धडकल्याने महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली सुदैवाने यात मनुष्यहानी झाली नाही केवळ कंटेनर चालक जखमी झाला असून त्यास लोणी-काळभोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.नेहमीप्रमाणेच शहर वाहतूक शाखेचे उमेश ढाकणे व कांबळे यांनी कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे व सहकाऱ्यांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली.

 

            याबाबत सविस्तर माहिती अशी की,कुंजीरवाडीतील धनश्री मंगल कार्यालयाजवळ ट्रक क्र.MH12, VT 8099 हा यु टर्न घेण्यासाठी थांबलेला असताना पाठीमागून येणारा कंटेनर. MH 43,BP 4878 याने पाठीमागुन धडक दिली अपघातात कंटेनर चालक जखमी झाला. पुढील कार्यवाहीसाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे मार्शल पोलीस. अंमलदार. कदम यांना कळवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *