पुणे- (हवेलीनामा वृत्तसमूह) उरूळीकांचन पोलिस स्टेशन हद्दीतील शिंदवणे गावामध्ये हातभट्टीवर कारवाई करून तब्बल ११२प्लास्टिक कॅन त्यामध्ये सरासरी ३९००लीटर तयार माल जप्त  करण्यात आला. पुणे ग्रामीणच्या उरूळीकांचन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंदे  करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला असून गावठी दारू,गांजा, गुटखा, बेकायदेशीर देशी विदेशी मद्य विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू आहे.त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून एकच खळबळ उडाली आहे अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदवणे (ता.हवेली) येथे मोठी कारवाई करत हातभटी दारू ११२ कॅन अंदाजे ३९०० लिटर हातभट्टी दारु जप्त करण्यात आली तसेच हातभट्टी बनवण्याची साधने जागीच नष्ट करण्यात आले. सदरची कारवाई उरुळी कांचन पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांचे पथकाने केली असून यामध्ये कांतीलाल जवार राठोड, (वय ३४ वर्ष, रा काळे शिवार वस्ती, शिंदवणे तालुका हवेली जिल्हा पुणे) यास ताब्यात घेण्यात आले आहे.
         ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक बारामती संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड स्वप्निल जाधव,यांच्या मार्गदर्शनाखाली उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ  पोलीस निरीक्षक शंकर पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पडुळे, सहाय्यक फौजदार उमेश जगताप,पोलीस हवालदार रमेश भोसले, पोलीस हवालदार सचिन जगताप,पोलीस हवालदार शशिकांत खाडे,पोलीस हवालदार होळकर, पोलीस शिपाई अमोल खांडेकर, पोलीस शिपाई अक्षय कामठे, पोलीस शिपाई अमोल राऊत तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार नागरगोजे, पोलीस हवालदार घाडगे, पोलीस हवालदार भुजबळ यांनी केली.पुढील तपास उरुळी कांचन पोलिस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *