पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) पुणे शहरासह उपनगरातील गुटखा माफियांवर सर्जिकल स्ट्राइक नेमकी कधी होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे,अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यात आतापर्यंत तरी यश आल्यानंतर गुटखा विक्रीवरील कारवाईकडे कधी मोर्चा वळणार याचीच सर्वांना आतुरता आहे.
       गुटखा माफियांची पाळेमुळे शोधण्यात ग्रामीण व शहरी भागात अन्न औषध प्रशासन तसेच पोलिस नेमके दुर्लक्ष का करत आहेत याचे कोडे सर्वसामान्य जनतेला पडले आहे पुणे शहर तसेच ग्रामीण भागातील गुन्हेगारी तसेच अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी शहर पोलिस आयुक्त तसेच पोलिस अधीक्षक यांनी कठोर पावले उचलली परंतु गुटखा मफिया मात्र अजूनही मोकाटच आहेत त्यामुळे गुटखा माफियांवर सर्जिकल स्ट्राइक करण्याचं धाडस अन्न औषध तसेच पोलिस प्रशासन करणार का याचीच चर्चा गावोगावी सुरू आहे.सध्या स्थितीत शहर उपनगर भागात गुटखाबंदी काही केल्या होईना त्यामुळे पंधरा ते तीस वयोगटातील अनेक युवक गुटक्याच्या व्यसनाच्या आहारी जात असून ही चिंतेची बाब आहे शहरी भागासह ग्रामीण भागात केवळ गुटखा विक्रेत्यावर तात्पुरती कारवाई केली जाते परत आठवड्या भरात परिस्थिती जैसे थे होते शासनाने बंदी घातलेला विमल,गोवा ,माणिकचंद गुटखा प्रत्येक चौकात गावातील तसेच शहरातील गल्लोगल्ली खुलेआम विक्री जोरात चालू आहे.
              केवळ किरकोळ टपरी धारकावरच एखादी कारवाई करुन केलेल्या कारवाईची वावा मिळवणारा अन्न व औषध प्रशासन यातील मोठे पुरवठादारांच्या मुसक्या आवळण्यासाठी नेमकी वाट कोणाची पाहत आहे हे मात्र न उलगडणारे कोडे आहे नगर रोड तसेच सोलापूर रोडवर लाखो रुपयांचा गुटखा नेमका येतो कुठून याचा शोध संबंधित विभाग घेऊन गुटखा विक्रीच्या साखळीचा बिमोड करणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे अन्न औषध प्रशासन व पोलिस प्रशासन आजपर्यंत केवळ किरकोळ गुटका विक्री करणार्यावरच कारवाई करत असून यातील बडे मासे मात्र मोकाटच आहेत अशा गुटखा माफिया विरुद्ध कारवाईची मोहीम तीव्र होऊन मोठी कारवाई होणे आवश्यक आहे.पूर्व हवेलीतील बहुतेक सर्वच गावांमध्ये गुटखा खुलेआमपणे विक्री होत आहे याला नेमका आशिर्वाद कोणाचा आहे यात संबधित विभागाच्या आर्थिक हित संबंधामुळे गुटखावरील कारवाई कडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे का याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. परंतु अनेकदा दबाव आल्यावर एखाद्या किरकोळ विक्रेत्यावर कारवाई करुन विषयाला बगल दिली जाते.महाराष्ट्र शासनाने गुटक्याची विक्री बंद केली यावर शासनाकडून कडक अमलबजावणी करणे अपेक्षित होते परंतु सध्या अवैधरित्या गुटका विक्रीने समांतर बाजारपेठ निर्माण केली आहे अन्न व औषध प्रशासन हरकतीमध्ये येऊन कारवाई होणे आवश्यक आहे. मुळात यावर बंदी असताना हा गुटखा येतो कुठून याचीही माहिती संबंधित खात्याला नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिस प्रशासन याच्या खोलाशी जाऊन मुख्यसूत्रधार गजाआड होणार का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *