पुणे (हवेलीनामा वृत्तसमुह) थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिलीच बैठक आज आयोजित करण्यात आली यात कारखान्याच्या अध्यक्षपदी सुभाष चंद्रकांत जगताप तर उपाध्यक्षपदी मोरेश्वर पांडुरंग काळे यांची बिनविरोध निवड झाली आली.निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शितल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचीत संचालक मंडळाची ही बैठक पार पडली.
           “यशवंत” च्या संचालक मंडळाच्या एकवीस जागांसाठी नऊ एप्रिल रोजी पार पडलेल्या निवडणुकीत हवेली बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, बाजार समितीचे विद्यमान संचालक व माजी सभापती प्रकाश जगताप, बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रशांत काळभोर आणि हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब चौधरी,यशवंतचे माजी संचालक पांडुरंग काळे यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने एकवीसपैकी तब्बल अठरा जागा जिंकत ऐतिहासिक विजय प्राप्त केला होता. तर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर व बाजार समितीचे विद्यमान सभापती दिलीप काळभोर यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेलला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले होते.यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी अनुक्रमे सुभाष जगताप व मोरेश्वर काळे या दोघांनीच उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत चर्चा झाली.
         यावेळी माजी सभापती प्रताप गायकवाड, पॅनेल प्रमुख प्रकाश जगताप, बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रशांत काळभोर व हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब चौधरी,कामगार नेते तात्यासाहेब काळे, यावेळी कारखान्याचे कारखान्याचे नवनिर्वाचीत संचालक संतोष आबासाहेब कांचन, सुनिल सुभाष कांचन, सुशांत सुनिल दरेकर, शशिकांत मुरलीधर चौधरी, विजय किसन चौधरी, ताराचंद साहेबराव कोलते, योगेश प्रल्हाद काळभोर, मोरेश्वर पांडुरंग काळे, अमोल प्रल्हाद हरपळे, राहुल सुभाष घुले, किशोर शंकर उंद्रे, रामदास सिताराम गायकवाड, सुभाष चंद्रकांत जगताप, हेमा मिलींद काळभोर, रत्नाबाई माणिक काळभोर, दिलीप नाना शिंदे, मोहन खंडेराव म्हेत्रे, कुंडलिक अर्जुन थोरात, सागर अशोक काळभोर, नवनाथ तुकाराम काकडे, शामराव सोपाना कोतवाल आदी उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *