पुणे (हवेलीनामा वृत्तसमूह) उरुळी कांचन मध्ये अवैध  गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो उरुळी कांचन पोलिसांनी पकडला असून १३लाख ८१हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (दिं २४) रोजी सायंकाळी उरूळी कांचन गावच्या हद्दीतील दत्तवाडी परिसरातील संदीप सुभाष कांचन यांच्या राहत्या घराजवळ, आडोशाला ही कारवाई करण्यात आली.उरूळी कांचन पोलिसांनी पॅक बंद बॉडी असलेला छोटा हत्ती क्रीम कलरचा टेम्पो एम एच १२ यू एम 8331टेम्पोसह तब्बल १३ लाख ८१ हजार १३८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी टेम्पोचा मालक समीर जयसिंग कांचन (रा. जय मल्हार रोड, उरुळी कांचन, ता. हवेली) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार रमेश सोमनाथ भोसले यांनी फिर्याद दिली आहे.उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत गुटख्याची वाहतूक करणारे वाहन जाणार असल्याची माहिती उरुळी कांचन पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सापळा रचून टेम्पो व त्याच्या चालकाला ताब्यात घेतले. या वेळी वाहनांची तपासणी केली असता त्यात  प्रतिबंधित केलेला गुटख्याची विमल नावचा पान मसाला सुगंधीत तंबाखू असलेली खाकी रंगाची पोती आढळून आली त्यानुसार बेकायदा गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोसह सुमारे १३ लाख ८१ हजार १३८ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.पुढील तपास उरुळी कांचन पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *