पुणे- (हवेलीनामा वृत्तसमूह) सहकारनगर पोलिसांच्या तपास पथकाने सायकल चोरी करणा-या आरोपीकडुन चोरीच्या ०६ सायकली हस्तगत केल्या असून सराईत सायकल चोर अंकुश भाऊसाहेब गोंडगीरे यास ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहकारनगर पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्याचा अनुषंगाने पोलिस स्टेशनचे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुरज गोरे व अंमलदार यांना सायकल चोरीचे अनुषंगाने तपास करुन विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दुर करणेबाबत व सायकल चोरांचा छडा लावण्यासाठी सांगितले असता तपास पथक पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये गस्त घालत असताना पोलीस अंमलदार महेश मंडलीक यांना बातमीदारकडुन बातमी मिळाली अंदाजे २०-२२ वर्षाचा इसम अंगात ग्रे कलरचे हुडी असलेले जरकिन व पांढरी जिन्स पॅन्ट घालुन संशयास्पद सायकल वर जवाहर बेकरी, धनकवडी याठिकाणी फिरत आहे, सदर बातमीवरुन तपास पथकाने त्यास हटकताच तो सायकलसह पळून जावु लागल्याने त्यास ताब्यात घेवुन नाव विचारले असता १) अंकुश भाऊसाहेब गोंडगीरे वय २१ वर्षे (सध्या रा.स्नेह घर खाशाबा जाधव स्कुल नं.४ शिवाजीनगर एसटी स्टॅण्ड मागे शिवाजीनगर पुणे मुळ रा. भानुसगाव ता. सोनेगाव जि. उस्मानाबाद) असे असल्याचे सांगीतले. त्याच्या ताब्यातील सायकली बाबत विचारले असता उडवा उडवीची उत्तरे दिली त्याने जानेवारी २०२४ पासुन के. के. मार्केट, स्मशानभुमी रोड तीन हत्ती चौक, बालाजी नगर या ठिकाणाहुन आणखी ०५ सायकल चोरी केलेचे कबुल करुन सायकली काढुन दिलेल्या आहेत. अशा एकुण ०६ सायकल त्याकडुन हस्तगत केलेल्या असुन, पुढील तपास सहकारनगर पोलिस करत आहे.
सदर कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त परीमंडळ-०२ श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पो. आयुक्त स्वारगेट विभाग नंदिनी वग्यानी, सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी पोलीस उप-निरीक्षक सुरज किरण गोरे, सहा. फौजदार बापु खुटवड, पोलीस अंमलदार किरण कांबळे, अमोल पवार, बजरंग पवार, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर कुंभार, सागर सुतकर, अमीत पद्माळे, संजय गायकवाड, निलेश शिवतरे, विशाल वाघ, भाऊसाहेब आहेर यांनी केलेली आहे.
