पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह)पुणे सोलापूर महामार्गावर यवत ता.दौड जवळ असणाऱ्या सहजपूर, म्हेत्रेवस्ती येथे दुपारच्या सुमारास दोन टेम्पोचा भीषण अपघात होऊन दोन्ही टेम्पो चालक जागीच मृत्यूमुखी पडले आहेत.

  यात प्रमोद अशोक चव्हाण (वय 41 वर्षे रा यवत चोभेमळा ता. दौंड जि पुणे) हे त्यांच्या ताब्यातील पांढरे रंगाचा 407 टेम्पो एम एच १२ एस एक्स २४६३ हा सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे जात असताना अनिल नागनाथ भोसले (वय 40 रा कोंडी जि सोलापूर) याने त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पो एम एच १२एल टी २९०५  हा चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव वेगाने डिव्हाडर तोडून पांढऱ्या रंगाच्या ४०७ टेम्पोवर जाऊन आदळला हायवेवर मोठा आवाज झाला या अपघाताची तीव्रता प्रचंड असल्याने या अपघातात प्रमोद अशोक चव्हाण, व अनिल भोसले, या दोघांचा मृत्यू  झाला. तर रामदास अंकुश जाधव (रा. माळवाडी हडपसर पुणे) यांना गंभीर दुखापत झाल्याने खाजगी दवाखान्यात उपचार घेत असून या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *