पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) स्विफ्ट एन लिफ्ट मिडियाच्या वतीने दिला जाणारा २०२४ या वर्षातील महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार बेस्ट कस्टमायजेशन एक्सेलन्स इन प्लास्टिक कॉम्पोनन्ट अॅवार्ड मायक्रोटेक पॉलिमर्स या संस्थेला जाहीर झाला असून पुरस्कार वितरण सोहळा हॉटेल लेमन ट्री प्रिमियम, पुणे येथे रविवारी दिनांक (३) रोजी मोठ्या दिमाखात पार पडला पुरस्कार देण्यासाठी मराठी सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते पुरस्कार्थी संस्थेचे संस्थापक रूपेश हनुमंत शिवरकर, गणेश जयवंत जाधव यांना देण्यात आला.
मायक्रोटेक पॉलिमर्स ही प्लास्टिक इंजेक्शन मोल्डिंग व्यवसाय मध्ये काय करते मायक्रोटेक पॉलिमर्स या कंपनीची स्थापना रूपेश हनुमंत शिवरकर व गणेश जयवंत जाधव यांनी भागीदारीमध्ये सन २०१९ मध्ये कंपनाची स्थापना केली होती या कंपनीत एकूण २३ ग्राहकांना प्लास्टिकची उत्पादने त्यांच्या गरजेनुसार पुरवली जातात. तसेच भारताबाहेर देखील मायक्रोटेक पॉलिमर्सने व्यवसाय सुरू करून भारताच्या निर्यातीमध्ये खारीचा वाटा उचलला आहेत. या कार्यक्रमाला उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होती.
