पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचारात दोन्ही पॅनल मध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी होते आहेत शेतकरी विकास आघाडी पॅनलचे प्रमुख पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संचालक प्रकाश जगताप कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी केलेल्या आरोपांना रयत सहकार पॅनलच प्रमुख यशवंतचे माजी व्हाईस चेअरमन माधव आण्णा काळभोर व पुणे जिल्हा बँकचे माजी संचालक प्रकाश म्हस्के यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सडेतोड उत्तर दिले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असताना प्रकाश जगताप यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा पाढाच वाचला जाऊ तिथं खाऊ या वृत्तीमुळे सहा एकर क्षेत्राचे शंभर एकरात रुपांतर झाले तुमच्या सर्व भ्रष्टाचाराचे पुरावे आमच्याकडे आहेत. तुमच्यात जर हिंमत असेल तर जाहीर सभेत समोरासमोर चर्चा करण्याची तयारी ठेवा,मग मी ते पुरावे दाखवतो. सिटीझन बँकेसंदर्भात पुरावे द्या, मग त्यानंतरच आरोप करा. स्वतःच्या गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था नीट चालवून नफ्यात आणा मगच यशवंत सहकारी साखर कारखाना चालवण्याचे स्वप्न बघा, असा घणाघात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के यांनी प्रकाश जगताप यांच्यावर केला आहे.लोणी काळभोर येथे अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनलच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली होती.यावेळी बोलताना प्रकाश म्हस्के यांनी ही टीका केली.यावेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन माधव काळभोर, साधना सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष काळभोर, कारखान्याचे माजी संचालक महादेव कांचन, कमलेश काळभोर उपस्थित होते.यावेळी बोलताना प्रकाश म्हस्के म्हणाले, बाजार समितीचे अध्यक्ष असताना प्रकाश जगताप यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. मांजरी येथील बाजारासाठी ५एकर जागा ८० रुपये प्रती स्क्वेअर फूट दराने विकत घ्यायची, असे तत्कालीन संचालक मंडळाने ठरवले होते. मात्र, सभापती प्रकाश जगताप यांनी ११० रुपये प्रती स्क्वेअर फूट दराने ही जागा खरेदी केली. या व्यवहारात बाजार समितीला २५ वर्षांपूर्वी ६७ लाख रुपये नुकसान सहन करावे लागले. यांनी बाजार समितीचे गेट पण सोडले नाही गेटचे ८० रुपये प्रती स्क्वेअर फूट दराने ठरलेल्या कामाचे प्रकाश जगताप यांनी ४२५ रुपये प्रती स्क्वेअर फूट दराने पैसे दिले. पार्किंगच्या टेंडर मध्ये किती पैसे खाल्ले ?म्हस्के म्हणाले, प्रकाश जगताप या निवडणुकीत कसे निवडून आले, याची माहिती सर्वांनाच आहे. अपात्र २७२ सभासदांमुळे तुम्ही परत बाजार समितीत निवडून आला आहात. पंधरा वर्षांपूर्वी तुम्ही सभापती असताना झालेल्या गैरव्यवहाराची तपासणी मुलाणी समितीने केली आहे कारण तुम्ही केलेल्या कारनामा समितीने जाहीर केलेले आहे मागील संचालक मंडळाप्रमाणेच याही वेळच्या संचालक मंडळात प्रकाश जगताप व प्रशांत काळभोर हे संचालक म्हणून निवडून जाताच मच्छी बाजार तयार करण्यासाठी ३५ व्यापाऱ्यांकडून किती पैसे घेतले आहेत, याचे सर्व पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. १८ वर्षे बंद असलेल्या हवेली तालुका खरेदी विक्री संघाचे कर्ज फेडण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार १२ गुंठे जागा विकसित केली आहे. त्या माध्यमातून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज फेडले आहे. सध्या संघाकडे ७० लाख रुपयांच्या ठेवी असून एक रुपयाही कर्ज नाही. प्रशांत काळभोर यांनी या संघामध्ये अध्यक्ष म्हणून काम केले आहे, आताचे अध्यक्ष दत्तात्रय पायगुडे तसेच संचालकांना या सर्व गोष्टींची कल्पना आहे. मात्र केवळ आरोप करायचा म्हणून आमच्यावर आरोप केला जात आहे. सिटीझन बँकेचा अध्यक्ष झालो त्यावेळी ५१ लाख रुपयांची ठेव व पुणे शहरात ७ शाखा होत्या. माझा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपला, त्यावेळी शाखांची संख्या ही वाढली होती आणि ठेवी या १६१ लाख रुपये होत्या. त्यानंतर तिघांच्या गैरव्यवहारामुळे बँक अडचणीत आली.शासकीय निर्णयामुळे बँक अभ्युदय बँकेत विलीन झाली. ही बँक कुणाच्या गैरव्यवहारामुळे अडचणीत आली, ते तुमच्या राजकीय गुरुला विचारा, ते व्यवस्थित माहिती देतील. सर्वांना माहिती आहे की, मी बँकेचा विकास किती केला आणि त्या बँकेतील ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवल्या.प्रकाश म्हस्के पुढे म्हणाले, आमच्या पॅनेलच्या उमेदवारांना मिळणारा प्रतिसाद पाहता, विरोधी पॅनलची पायाखालची वाळू घसरली आहे त्यामुळे ते आमच्यावर बिनबुडाचे आरोप करत असून आरोप करताना आरशासमोर एकदा उभे रहा
