पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) राजगुरुनगर येथील तलाठ्याला दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याबाबत ३७वर्षीय तक्रारदाराने लाचलूचपत विभागाकडे तक्रार केली होती राजगुरुनगरचे तलाठी बबन कारभारी लंघे वय(४६) असे आहे

याबाबत लाचलूचपत पथकाने दिलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार व त्याच्या मित्रांची पत्नी असे दोघांच्या भागादारीमध्ये एक गुंठा क्षेत्र सामाईका मध्ये खरेदी केली असून त्याची नोंद करुन सातबारा उतारा देण्यात करिता तलाठी बबन लंघे यांनी तक्रारदार यांच्या कडे सातबारा उतारा नोंद करून उतारा देण्यासाठी पंधरा हजार रूपयांची लाच मागितली. तक्रारदार याने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली तक्रारदाराच्या तक्रारीची पडताळणी केली असता तडजोडीअंती दोन हजार रुपयांची लाच  तलाठी लंघे याने तक्रारदार यांच्या कडून स्वीकारताना रंगेहाथ पकडले

ही कारवाई लाचलुचपतचे प्रतिबंधक विभागानचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे ,अप्पर पोलिस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रणोत सांगोलकर यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *