पुणे- (हवेलीनामा वृत्तसमूह) हवेली तालुक्यातील गावे पुणे शहरालगत असल्याने या गावांमध्ये लोकसंख्या मोठ्या झपाट्याने वाढत असून जमीन खरेदी विक्री नोंदी तसेच विविध दाखले यासाठी नागरिकांची तलाठी तसेच सर्कल कार्यालयात वर्दळ असते त्यामुळे आता नागरिकांची तसेच शेतकऱ्यांची कामे जलदगतीने होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हवेलीतील महसूल कार्यालयाचे विभाजन केले असून पूर्वी आठ सर्कल सज्जे होते त्यामुळे कामाचा ताण येत होता अनेक कामे प्रलंबित राहून शेतकरी तसेच सामान्य नागरिकांना कार्यालयात चक्करा माराव्या लागत होत्या. त्यामुळे पूर्वीच्या सर्कल कार्यालयाचे विभाजन करुन नव्याने पंधरा मंडल (सर्कल) कार्यालयाची निर्मिती केली. हवेली तालुक्यातील गावांमध्ये असणारे तलाठी कार्यालय, सर्कल कार्यालयात नागरिक तसेच शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. परंतु या कार्यालयामध्ये झिरो(कॅंडिडेट) यांचा राबता असतो प्रत्येक तलाठी सर्कलच्या दिमातीला दोन खाजगी लोक असतात त्यांना शासनाच्या महसूल विभागाची कुठलंही अधिकृत परवानगी नसते तरी देखील ही मंडळी विनापरवाना कुणाच्या आशिर्वादाने कार्यालयात सरकारी दस्तावेज, गाव नमुना नोंदवह्या,महत्वाचे सरकारी दस्तावेज, संगणकावर नोंदी टाकणे,सातबारावरील चूक दुरुस्त करणे, अशी कामे करत असून गावातील सरकारी दस्तावेज हाताळताना राजरोसपणे दिसून येत आहेत ही धक्कादायक बाब असून तिच परिस्थिती सर्कल कार्यालयात देखील आहे प्रत्येक मंडल अधिकार्यांचे दिमतीला दोन तीन खाजगी लोक अगदी खुर्चीवर दाबात बसून महसूल कर्मचारी असल्या सारखे वागतात यांना नेमकं वेतन देत तरी कोण विना वेतन काम करतात तरी कसं हा संशोधनाचा विषय झाला आहे असून बिन पगारी फुल अधिकारी अशी स्थिती झिरोंची आहे. तलाठी तसेच सर्कल ची अनेक कामे ही मंडळी करत असतात महसूल कार्यालयात शेतकरी तसेच सामान्य नागरिक गेल्यावर पहिल्यांदा यांना भेटावे लागतं नंतर अधिकारी भेटतो त्यामुळे चहा पेक्षा किटली गरम असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे त्यामुळे कामासाठी येणारा शेतकरी झिरोंमुळे हैराण झाला आहे. काही तलाठी सर्कल कार्यालयात तर ही मंडळी चक्क ठाण मांडून बसलेली असतात या मंडळीमुळे कार्यालयात कामानिमित्त गेलेले नागरीक आपल्या व्यथा मांडताना अडचण होते.ही मंडळी महसूली कामाची गोपनीय माहिती बाहेर देत असल्याचा आरोप देखील शेतकरी करत असतात .त्यामुळे हवेली तालुक्यातील महसूल विभागातील तलाठी तसेच सर्कल कार्यालये झिरो मुक्त होणार का याची चर्चा हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये सुरू असून यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार का याकडे शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिक यांचे लक्ष लागले आहे. सातबारा फेरफार निर्गती विविध प्रकारचे दाखले मिळविण्यासाठी शेतकरी तसेच सामान्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे महसूलला लागलेली झिरोंची (कॅंडिडेट) वाळवी संपणार तरी कधी अशी चर्चा हवेली तालुक्यातील शेतकरी तसेच सामान्य नागरिकांमध्ये आहे.हवेलीचे तहसीलदार यांची गंभीर दाखल घेऊन झिरो (कॅंडिडेट) मुक्त महसूल कार्यालये करणार का याकडे शेतकरी नागरीकांचे लक्ष लागून राहिले आहे
