पुणे -( हवेलीनामा वृत्तसमूह) केसनंद (ता.हवेली) येथील टाटा यझाकी एम्प्लॉईज सहकारी पतसंस्थांच्या संचालक मंडळाच्या  २०२४ते२०२९ पंचवार्षिक निवडणुकीच्या अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत साई विकास पॅनलने११/० ने बाजी मारत सर्व जागेवर आपले उमेदवार निवडून आणले या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून एस एस मोरे यांनी काम पाहिले.

 साई विकास पॅनल विरुद्ध ओम परिवर्तन पॅनल अशी दहा जागांसाठी सरळ लढत झाली यात साई विकास पॅनलचे सर्वच्या सर्व दहा उमेदवार बहुमताने विजयी झाले तर एक उमेदवार बिनविरोध निवडून आला होता त्यामुळे साई विकास पॅनलने प्रतिस्पर्धी ओम परिवर्तनचा ११/० ने धुव्वा उडविला निकाल जाहीर होताच  कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

निवडून आलेले संचालक पुढील प्रमाणे सर्व साधारण गट एकूण जागा सहा १) नवनाथ सिताराम मदगुले २) बाळासाहेब शिवराज मोठे ३) माणिक सोमनाथ तांबे ४)विकास गणपत अंध्याल,५) निलेश काळूराम पायगुडे, ६) तुषार गोविंद पोहेकर हे विजयी झाले. नागरिकांचा मागास प्रवर्गातून १) ज्ञानेश्वर सुधाकर राऊत तर महिला राखीव गटातून दोन जागेसाठी १) पल्लवी सागर गौर, २) प्रेरणा रामू इटिकला या विजयी झाल्या तर वि.जा./भ.ज.वि.मा.प्रवर्गातील एका जागेवर १) प्रदीप गणपत थोरात हे विजयी झाले तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील एका जागेवर १)विकास छगन पाटोळे हे बिनविरोध निवडून आले आहेत संचालकपदाच्या ११जागेसाठी झालेल्या निवडणुकीत साई विकास पॅनलच्या विजयी उमेदवारांचे संस्थेच्या सभासदांनी अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *