पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह )थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना निवडणूकीत उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था, ब वर्ग  या गटातून अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनलचे पॅनलचे संजय गायकवाड यांनी निवडणूकीतून माघार घेऊन आण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेलचे सोसायटीच्या ब वर्गातील उमेदवार सागर अशोक काळभोर यांना पाठिंबा दिला याबाबत संजय गायकवाड यांनी मेजेस्टिक हाँटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत यशवंत सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर करुन आण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेलच्या ब वर्गातील सागर अशोक काळभोर यांना संपूर्ण पाठिंबा दिला असल्याचे पत्र संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सादर केले त्यामुळे अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलचे पाठिंबा दिल्यामुळे बळ वाढले असून त्यांचा एक उमेदवार आता विजयी घोषित झाल्यासारखे चित्र आहे गायकवाड यांनी आण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेला पाठिंबा दिल्यामुळे विरोधी आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेला धक्का बसला असून हवेली तालुक्यात यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचाराचा नारळ फुटण्यापूर्विच एका उमेदवाराने माघार घेऊन पाठिंबा जाहीर केल्यामुळे  तालुक्यात खळबळ उडाली आहे. यावेळी रयत सहकाराचे पॅनल प्रमुख माधव आण्णा काळभोर,बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर,रोहीदास उंद्रे, महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *