पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) अतितटीच्या लढतीत महिला गटाच्या प्रकाश तात्या बालवडकर संघाने मातृभूमी क्रीडा संस्था संघाचा ३९-२४ ने असे पराभूत करताना शिवसेना कसबा मतदार संघ आणि पूना अमॅच्युअर्स संघाच्या वतीने कै. शंकरराव ढमाले स्मृती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील आपली आगेकूच कायम केली.

प्रकाश तात्या बालवडकर संघाकडून हर्षा शेट्टी, अंकिता पिसाळ यांनी जोरदार खेळी करत विजय खेचून आणला. तर मातृभूमी क्रीडा संस्था संघाच्या
काजल तमाता, निकिता चव्हाण यांनी जोरदार प्रतिकार केला.

सोमवारी रात्री उशीरा झालेल्या फेरीत अतितटीच्या लढतीत मॉडर्न स्पोर्ट्स संघाने सिंहगड स्पोर्ट्स संघाला २६-२१ असे पराभूत करत विजय खेचून आणला.

पुरुष गटाच्या ओम साई संघ चिखली २६-२३ असा शिवाजी विजय संघ चिंचवडचा पराभव करत विजय खेचून आणला. यामध्ये अभी वाघमोडे याने उत्तम कामगिरी केली. ओम साई संघाकडून श्रीधर कदम, गणेश यादव, अनुराज बवले यांनी जोरदार खेळी करत संघ विजयी केला.

महिला गटाच्या मातृभूमी संघ ३३-१४ असा गुणांनी ब्रम्हा विष्णू महेश स्पोर्ट क्लब संघाचा पराभव केला. मातृभूमी संघाकडून निकिता चव्हाण, नेहा चव्हाण, निशा गुप्ता, संध्या परब यांनी उत्तम कामगिरी केली. त्याचबरोबर ब्रम्हा विष्णू महेश स्पोर्ट क्लब संघाकडून संतोषी थोरवे, अमृता जाधव, आरती पतंगे यांनी जोरदार प्रतिकार केला.

आकांशा स्पोर्ट क्लबने ५०-२५ ने लोकश्री ज्ञानपीठ संघाचा पराभव केला. आकांशा स्पोर्ट क्लबकडून पुष्पा चौधरी, विद्या जगताप, गायत्री गोडसे यांनी विजय खेचून आणला. तर अनुष्का शिर्के, समीक्षा गुरव, समृद्धी सोनार यांनी जोरदार प्रतिकार केला.

शिवाई स्पोर्ट ३१-१० असे गुण मिळवत कुरंजाई माता संघाचा पराभव केला. शिवाई स्पोर्टकडून मधुरा गायकवाड, प्राची कांबळे, कल्याणी थोरात यांनी चांगली कामगिरी केली. तर कुरंजाई माता संघाकडून ऋतुजा क्षीरसागर, तृप्ती धावडे, साक्षी पवार यांनी जोरदार प्रतिकार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *