पुणे – (हवेलीनामा वृत्तसमूह) शिवसेनेचे खानापूर आटपाडी मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं आहे वयाच्या 74व्या वर्षी त्यांचे निधन झालं असून त्यांना निमोनिया झाल्यामुळे त्यांना सांगली येथील एका खाजगी रुग्णालयात काल दुपारी ॲडमिट करण्यात आलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू साथीदार म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे वयाच्या ७४व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे आज पहाटेच्या सुमारास अनिल बाबर यांचं दुःखद निधन झालं आहे त्यांच्या जाण्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे खानापूर आटपाडी मतदारसंघाचे गेले अनेक वर्षापासून ते आमदार होते मतदार संघामध्ये टेंभू योजनेचे जनक म्हणून त्यांची ओळख होती निमोनिया मुळे त्यांचे आज पहाटे निधन झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
