पुणे-(हवेलीनामा वृत्तसमूह) लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायवाडी येथील इयत्ता सातवीतील विद्यार्थी कु. रामा शंकर पवार यांनी यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत पुणे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी संकुलात मैदानी स्पर्धेत थाळीफेक प्रथम क्रमांक. लांब उडी द्वितीय क्रमांक. 100 मीटर धावणे तृतीय क्रमांक यामध्ये क्रमांक पटकावल्याबद्दल पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर, ग्रामपंचायत सदस्य भरत काळभोर. नागेश काळभोर. अमित काळभोर. शुभम धावणे शिक्षक गणेश खाडे मान्यवर उपस्थित होते.
