पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह) दिल्लीत लोकसभेच हिवाळी अधिवेशन सुरू आहे आज हिवाळी अधिवेशनातून सुप्रिया सुळे यांच निलंबन करण्यात आले आहे.काही दिवसांपूर्वीच त्यांना संसदरत्न पुरस्कार जाहिर झाला आहे. खासदार सुळे यांच्यासह 49 खासदारांना आज निलंबन करण्यात आले आहे केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेगवाल लोकसभेत सुप्रिया सुळे, शशी थरूर मनीष तिवारी मोहम्मद फैजल कीर्ती चिदंबरम सुदीप बंदोपाध्याय दिनेश आली डिंपल यादव यांच्यासह आणखी विरोधी पक्षाच्या खासदारांचा निलंबनाचा प्रस्ताव लोकसभेत मांडला आहे. गेली दोन दिवस पासून विरोधी पक्षाचे लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहातील 141खासदार निलंबित केले आहे.संसदेतील सुरक्षेचं प्रकरण झालं होतं काही युवकांनी आत प्रवेश केला होता या प्रकरणावर दोन्ही सभागृहातील सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता त्यामुळे दोन्ही सभागृहात गदारोळ सुरू होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *