पुणे -(हवेलीनामा वृत्तसमूह)  कीर्तिराज शैलेंद्र आगलावे यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्ष कार्यालयात त्यांना निवडीचे पत्र दिले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या (राष्ट्रीय कार्याध्यक्ष) खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची विचारधारा  व तत्वांना केंद्रस्थानी ठेवून पक्षाचा पुणे शहरात  जोमाने विस्तार करून पक्ष संघटना मजबूत करुन पक्ष बळकट करण्यासाठी मिळालेल्या पदाचा वापर करणार तसेच पक्षाचे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, सचिन तावरे यांच्या खंबीर साथीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार करणार असल्याचे हवेलीनामाशी बोलताना आगलावे यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *