पुणे (हवेलीनामा ऑनलाईन)   आळंदी(म्हातोबा) येथील शिवव्याख्याते व माजी. उपसरपंच वाल्मिक म्हातु जवळकर यांचे  बंधू. मोहन म्हातु जवळकर यांचे रविवारी वयाच्या  ४५ व्या वर्षी अपघाती निधन झाले. . आपल्या भावाची आठवण कायमस्वरूपी स्मरणात रहावी यासाठी गावातील वृक्षारोपण संवर्धन समिती यांच्या पुढाकाराने अस्थी विसर्जन न करता पर्यावरणपुरक उपक्रम हाती घेऊन   त्यांच्या अस्थि नदीत विसर्जीत न करता, त्या एक खड्डा घेऊन त्यात विसर्जित कराव्यात असे त्यांचे बंधू वाल्मिक जवळकर , माऊली जवळकर , जालिंदर जवळकर यांनी आपली  ईच्छा व्यक्त केली यास समितीच्या वतीने तात्काळ होकार देऊन समितीच्या पुढाकाराने वैकुंठधाम पानमळा येथे एक देशी वडाचे वृक्ष लावून अस्थि विसर्जन करून त्यावर वृक्ष लावण्यात आले.
वृक्षारोपण संवर्धन समितीच्या माध्यमातून नदी प्रदूषण रोखण्यासाठी ‘माणसाच्या निधनानंतर रक्षा (अस्थि) नदीत विसर्जित न करता त्या खोल खड्डा घेऊन त्यात एक वृक्ष लावावे’ हि संकल्पना गेली  दोन ते तीन वर्षांपासून आळंदी म्हातोबाची गावात राबविण्यात येत आहे. पाण्यात अस्थि विसर्जित केल्याने नदीचे पाणी दूषित होते व आपल्या गेलेल्या व्यक्तीची आठवण आपणास राहत नाही. त्यामुळे समितीच्या वतीने वृक्ष लावून त्यात अस्थि विसर्जित करून ती मृत  व्यक्ती आपणास सदैव आठवणीत रहावी आणि त्या वृक्षापासून पर्यावरणाचे व नदीचे प्रदूषण थांबावे हाच हेतू आहे.
सर्वत्र सिमेंटचे जंगल तयार होत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे . पाण्यात रक्षा विसर्जीत केल्याने नदीचा प्रवाह प्रदूषित होऊन पाण्यातील कृमी-किटकांनाही ते हानिकारक होते , त्या अनुषंगाने पारंपरिक रूढी परंपरेला फाटा देऊन अस्थि विसर्जन न करण्याचा जो निर्णय घेतला तो अगदी कौतुकास्पद आहे असे मत समितीचे अध्यक्ष संदिप शिवरकर यांनी व्यक्त केले .
या प्रसंगी त्यांची पत्नी लंका मोहन जवळकर, मुलगा कुणाल जवळकर, मुलगी आदिती जवळकर,तसेच त्यांची आई सिंधुबाई जवळकर , वडील म्हातु जवळकर यांनी हि  परवानगी दिल्याने शक्य झाले . तसेच या कामासाठी संतोष जवळकर व बापू जवळकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले यावेळी वृक्षारोपण संवर्धन समिती व ग्राहक पंचायत हवेली तालुक्याचे अध्यक्ष.संदिप शिवरकर, माजी. उपसरपंच बापूसाहेब जवळकर , काळभैरवनाथ पतसंस्था चे संचालक माऊली जवळकर , ग्रामपंचायत सदस्य विनायक जवळकर , जालिंदर जवळकर , समितीचे सदस्य संतोष शिवरकर , सनी शिवरकर , गौरव जवळकर ,  भाग्यश्री चौधरी , अंकुश चौधरी , सुनीता कुंजीर , प्रतिक्षा सातव , स्वप्नाली जवळकर , दिपाली जवळकर व नातेवाईक  ग्रामस्थ उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *