पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) कोरोना महामारीच्या अनुषंगाने सार्वजनिक उत्सवावर आलेल्या निर्बंधामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरे करावेत व काही समाजोपयोगी उपक्रम हाती घेऊन सामाजिक बांधिलकी पार पाडावी असे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी आवाहन केले होते यास बारामती शहर व वालचंदनगर पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, सामाजिक संघटना, युवा कार्यकर्ते, महिला मंडळे, व महाविद्यालयीन युवक व युवती यांच्या सहकार्याने महा रक्तदाब शिबिराचे आयोजन केले यीस्ट तब्बल १००० पेक्षा अधिक रक्त पिशव्या रक्त जमा झाले.

          कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे रक्ताचा पुरवठा अतिशय कमी आहे त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे अशावेळी प्रत्येक नागरिकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे महाराष्ट्र पोलीस हे आपली महत्वाची भूमिका पार पाडत असताना अनेक समाजोपयोगी उपकक्रमात सहभागी होत असते असाच एक उल्लेखनीय उपक्रम आज जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या अवाहनास प्रतिसाद देऊन बारामती शहर व वालचंदनागर पोलीस यांनी महारक्तदान शिबिराचे आयोजन केले याचे उद्घाटन डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,विभागीय पोलीस अधीक्षक नारायण शिरगावकर व बारामती शहर प्रभारी पोलीस अधिकारी नामदेव शिंदे यांनी स्वतः रक्तदान करून केले.
         येथे जमा झालेले रक्त अक्षय रक्तपेढी,पंढरपूर रक्तपेढी,आशा रक्तपेढी यांना देण्यात आले, या शिबिरास रक्तपेढ्यांचे तज्ञ डॉक्टर व परिचरिकांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *