पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) महाराष्ट्रात गणपती चे उपासक अधिक असले तरीही संपूर्ण भारत वर्षात गणेशाची मनोभावे पूजा केली जाते सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सव चालू असून राज्यातील अष्टविनायक मंदिर दर्शनासाठी बंद आहे परंतु आपल्या शेजारील असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील इंदौर येथील खजराना गणेश मंदिर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे.सर्वात श्रीमंत गणपती मंदिरात  हे गणले जाते.

        तसे इंदूर हे महाराष्ट्रीय परंपरा लाभलेलं मध्यप्रदेशातील ऐतिहासिक शहर येथील धार्मिक सामाजिक चालीरीती आपल्या सारख्याच या शहरात देखील गणेशोत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जातो परंतु येथील श्री खजराना गणेश मंदिर हे सुप्रसिद्ध असून भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे अशी ख्याती आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून ही गणेश मूर्ती स्वयंभू आहे. हे मंदिर १७७५ मध्ये महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी याची ख्याती आहे. येथे दररोज हजारो भक्तांना मोफत महाप्रसाद वाटप केला जातो तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात या मंदिरात भक्त आपली इच्छा बोलून हातात धागा बांधतात व ती पूर्ण झाल्यावर तुळदं करून आपले नवस फेडतात.
        सध्या कोरोनाच्या काळातही अनेक भाविक दर्शनासाठी येतात आपल्या राज्यात देवदर्शन बंद आहे परंतु इतर राज्यात हा गणेशोत्सव मोठया धुमधडाक्यात चालू आहे येथे केवळ इंदूर मधील भाविक दर्शनासाठी येतात असे नाही तर संपूर्ण माध्यप्रदेशातून मोठया संख्येने भक्त येथे येतात.
         महाराष्ट्रात गणपतीचे महत्त्व मंगळवारी विशेष आहे परंतु या खजराना गणपतीस भक्त बुधवारी दर्शनासाठी येतात जवळपास एक लाख भाविक प्रत्येक बुधवारी दर्शनासाठी यात असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *