पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) पुणे सोलापूर महामार्गाकडे गेल्या एक ते दीड वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले असून याचा दुष्परिणाम वाहन चालकांना भोगावा लागत आहे म्हणारंगाच्या दोन्ही बाजूंना मातीचे मोठे थर तयार झाले असल्याने रस्त्याची रुंदी पाच फुटाने कमी झाली परिणामी वाहने पावसाळ्यात घसरण्याचे प्रमाण वाढले यावर अनेक वेळा तक्रारी करूनही काहीच मार्ग निघेना त्यावेळी रस्त्यातील खड्डे बुजविण्यासाठी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आदर पुनावाला क्लीन सिटी यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,लोणी काळभोर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने कवडीपाट टोलनाक्यापासून लोणी स्टेशन परिसरातील महामारगावरील सर्व खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली.वाहतूक शाखेचे अधिकारी व त्यांचे सहकारी हे या कामात सक्रिय झाले केवळ वाहतूक नियंत्रण एवढेच काम न करता सामाजिक उपक्रमाठी ते उपलब्ध होत असल्याने त्यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी दिसून येत आहे.
तर महामार्गाच्या दोन्ही बाजूला साचलेली माती काढण्यासाठी कदमवाकवस्तीचे स्थानिक उद्योजक सतीश चावट,सुशील चावट यांनी बाँँपकट मशीन उपलब्ध करून दिली व ग्रामपंचायत कदमवाकवस्ती च्या वतीने ट्रॅक्टर मिळाल्याने दोन्ही बाजूनी माती काढण्यात आली यावेळी लोणी काळभोर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे,पोलीस नाईक आनंद साळुंखे,महेश मडके,समीर काकडे,शिंदे,पवार यांची मोलाचे सहकार्य लाभले.तर आदर पुनावाला क्लीन सिटीचे पर्यवेक्षक संतोष उफाळे व विकास गाढवे यांनी आपल्या सर्व डागडुजीच्या पथकासह काम पूर्ण केले.यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे,हवेली तालुका अध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे उपस्थित होते
मनसे सहकार सेनेचे हवेली तालुका अध्यक्ष अनुल सुरेश कुंजीर, तालुका उपाध्यक्ष विश्वजित काळभोर, तालुका उपाध्यक्ष विद्यार्थी सेना सनी फलटणकर,दीपक मराठे,विजय ढोपरे,अतुल काळभोर यांनी याकामी मदत केलेल्या स्थानिक नागरिकांचे आभार मांडले.

