राजगुरूनगर  (हवेलीनामा ऑनलाइन)  पुणे – नाशिक महामार्गावर असलेल्या खेड घाटात एका चारचाकी मोटारीत बिघाड होऊन व चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे सुमारे १५० फुट खोल दरीत मोटार कोसळली. खेड पोलिसांनी तत्परता दाखवल्याने जखमी मोटारचालक बचावला.
        संजय मधुकर खैरनार (वय ४९, रा. नाशिकरोड, नाशिक) असे चालकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी ( दि.१४ ) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. खैरनार हे नाशिकवरून पुण्याला नातेवाईकांकडे जात होते. पुणे -नाशिक महामार्गावर खेड घाटात आल्यानंतर नवीन बाह्यवळणाजवळ अचानक मोटारीत बिघाड झाला. घाटात गाडी थांबवून खैरनार यांनी गाडीची पाहणी केली आणि पुन्हा गाडी सुरू केली असता अचानक गाडीचा वेग वाढला व नियंत्रण सुटल्याने मोटार थेट १५० फुट दरीत गेली. दरम्यान, एका स्थानिक नागरीकाने खेड पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
      पोलीस अंमलदार स्वप्नील गाढवे आणि त्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दरीत उतरुन चारचाकी गाडीच्या काचा फोडून जखमी अवस्थेत असणाऱ्या खैरनार यांना बाहेर काढले. आणि वेळेत उपचारास पाठविले. त्यामुळे ते सुरक्षित राहीले.
      खेड घाटातील बाह्यवळण रस्त्यावर अनेक ठिकाणी सरंक्षक कठडे नाही. खैरनार याची गाडी दरीत कोसळली झाडाझुडपांत गाडी अडकल्याने व पोलीस तात्काळ घटनास्थळी धावून गेल्यामुळे चालक खैरनार यांचा जीव वाचला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *