थेऊर [हवेलीनामा वृत्तसमूह] जालन्यातील मराठा समाजातील अंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्ज विरोधात संपूर्ण राज्यात निषेध व्यक्त करण्यात येत असून ठिकठिकाणी तिवृ अंदोलन होत आहेत अनेक जिल्ह्यात बंद पुकारण्यात येत आहे.पूर्व हवेलीतील लोणी-काळभोर येथे देखील गावबंद ठेवून निषेध करण्यात आला.थेऊर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या गुरुवारी गावबंद आंदोलन करण्यात येणार आहे.

थेऊर हे धार्मिक पर्यटनस्थळ असून राज्यभरातील भाविक श्री चिंतामणी दर्शन घेण्यासाठी येतात. येणार्‍या भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल तसेच अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आल्या आहेत. सर्व व्यापारी वर्गाकडून सहकार्य मिळेल अशी आंदोलन कार्यकर्त्यांकडून आशा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *