पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पीएमपीएमएल सेवा पुरवत असलेल्या संपूर्ण संचलन क्षेत्रात प्रवाशांसाठी दैनिक व मासिक पास सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांसह पी.एम.आर.डी.ए. हद्दीत बस सेवा पुरविण्यात येते.

सध्या एका मनपा हद्दीसाठी दैनिक पास रूपये 40 व मासिक पास रूपये 900 तर दोन्ही मनपा हद्दीसाठी दैनिक पास रूपये 50 व मासिक पास रूपये 1200 असे पास वितरीत करण्यात येत असून ही सुविधा सुरूच राहणार आहे. या व्यतिरिक्त महापालिकेबाहेरील संपूर्ण संचलन क्षेत्राकरीता दैनिक पास रू. 120 व मासिक पास. 2 हजार 700 रुपये अशी पास सुविधा नव्याने सुरू करण्यात येत आहे.

पी.एम.आर.डी.ए. संचलन क्षेत्रातील नोकरदार, महिला व लोकप्रतिनिधी यांनी पी.एम.आर.डी.ए. हद्दीतीलप्रवाशांकरीता पूर्वीच्या संपूर्ण संचलन क्षेत्रासाठी असलेल्या पासच्या दरात काही प्रमाणात दरवाढ करून पूर्वीप्रमाणेच दैनिक पास व मासिक पास सुरू करणेबाबत वारंवार पत्रव्यवहार करून मागणी केलेली आहे.त्याला अनुसरून पीएमपीएमएलच्या संपूर्ण संचलन क्षेत्राकरीता दैनिक पास 120 व मासिक पास 2 हजार 700 रुपये असा सुरू करण्याचा संचालक मंडळाचे बैठकीत निर्णय झालेला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून ही महापालिका हद्दीबाहेरील दैनिक पास सुविधा बंद करण्यात आली होती त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकास याचा मोठा फटका बसत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *