लोणी-काळभोर [हवेलीनामा वृत्तसमूह] पुणे सोलापूर महामार्गावर हाॅटेल मनाली एका दुचाकीस्वार घसरल्याने पाठीमागून आलेल्या वाहनाखाली येऊन जागीचा ठार झाला असून वाहतूक पोलिसांच्या मदतीने ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

आज भल्या पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास थोडा रिमझिम पाऊस पडल्याने पुणे सोलापूर महामार्गावर पुण्याकडे जाणार्‍या मार्गावर एका दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटले व घसरुण पडला तेंव्हा पाठीमागून येत असलेल्या अवजड वाहनाखाली तो आला.वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला.

या अपघाताची खबर मिळताच वाहतूक शाखेचे आमलदार महेश ढाकणे,कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे,काणेकर व लोणी-काळभोर पोलीस स्टेशनचे बालाजी बांगर हे घटनास्थळी पोहोचले त्यानंतर त्यांनी रुग्णवाहिकेस पाचारण करून ससून रुग्णालयात पाठविण्यात आले.

माजी सरपंच सचिन तुपे नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतात पुणे सोलापूर महामार्गावर बहुतेक अपघातस्थळी मदत करतात आजही पहाटे व्यायामासाठी बाहेर पडले असता या अपघाताची खबर मिळाली ते अपघातस्थळी धावले आणि अपघातग्रस्तास रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात दाखल केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *