पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सर्वसामान्य नागरिकाच्या दैनंदिन जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते परंतु याकडे जनतेचे मायबाप म्हणवून घेणारे स्थानिक नेते किती अधिर होऊन लक्ष देतात हा संशोधनाचा विषय आहे.अनेकजण दैनंदिन कामकाजासाठी,शिक्षणासाठी,रोजगारासाठी दररोज घराबाहेर पडतात.यासाठी यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून रहावे लागते.पुणे शहराचा विकास झाल्यानंतर उपनगरांतून शहरात येणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे.यातील मोठा वर्ग पी एम पी एम एलच्या बसमधून प्रवास करतात.शहरातील हक्काची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून तिच्याकडे पाहिले जाते.परंतु अनेकवेळा या पी एम पीच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल होतात यासाठी स्थानिक नेत्यांकडे वेळच नसतो.
थेऊर हे अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असून शहरालगत असलेले गाव आहे येथून दररोज शालेय विद्यार्थी,कामगार, पर्यटक आदी प्रवास करतात.गेल्या काही महिन्यांपासून थेऊर येथील ही बससेवा विस्कळीत झालेली आहे याचा फटका महिला विद्यार्थी आणि कामगारांना बसला आहे.पी एम पी कडून पूर्वी प्रवाशांसाठी चार बस उपलब्ध करून दिल्या होत्या.त्यामुळेच वीस ते पंचवीस मिनिटाच्या अंतरावर बस उपलब्ध होत असे यात काही कालावधीनंतर एक बस कमी करण्यात आली.परिणामी हे अंतर वाढले यावर देखील नागरिकांकडून तक्रार करुन काहीच उपयोग झाला नाही कारण पी एम पीची यात मोनोपाॅली आर्थात मक्तेदारी आहे.
थेऊर येथील ही बससेवा विस्तारित करुन वाघोलीपर्यंत वाढवण्यात आली हे नियोजन करताना बस किती वाढणार याचे काहीच उपाययोजना करण्यात आली नाही उपलब्ध तीन बस पुढे वाढवल्या याचा परिणाम थेऊर कोलवडी येथील दैनंदिन प्रवाशांचे हाल वाढले.याचा मात्र स्थानिक पुढाऱ्यांना कसलीच माहिती नाही ज्या सर्वसामान्य जनतेच्या मतांवर आपण राजकारण करतो त्यांच्या अडचणी काय आहेत याकडे स्वतः पुढाकार घेऊन सोडविण्याचा का प्रयत्न होत नाही हा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहे.
सध्या थेऊर येथील बसचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे याकडे स्थानिक नेत्यांनी लक्ष घालणे अपेक्षित आहे.दैनंदिन प्रवास करणार्यांनी पुढाकार घेऊन एक निवेदन देण्यात आले होते यावर केवळ वेळ काढूपणाच चालू असल्याचे दिसून येते सायंकाळनंतर कधी बस मिळेल याची शंकाच असते तीन बसमधील एक बस अनेकदा बंद असल्यास दोन तास बस मिळत नाही त्यामुळे हडपसर गाडीतळ येथे दोन तास ताटकळत बसावे लागते.
यातील कळस म्हणजे जे प्रवाशी पुण्यातून आपल्या घराकडे निघाल्यावर हडपसर येथील गाडीतळ बसस्टॉपवर पोहोचतात तेंव्हा तेथील स्टार्टरकडून सांगण्यात येत की एक बस बंद आहे त्यावर या प्रवाशाच्या मनाची काय अवस्था होत असेल याची कल्पनाच या प्रशासना येणार नाही शेवटी अगतिक प्रवाशी तो !
