पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह]   (पुजारी सर)    येथील यशवंत सहकारी साखर कारखाना चालूच करायचा असा चंग कारखान्याच्या सभासदांनी बांधला असून यासाठी सर्व सभासद एकमेकांच्या मदतीला धावले आहेत. संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी सभासद निधी उपलब्ध करून देण्यात यावा असे प्रशासकांनी सर्वसाधारण सभेत सांगितल्यावर माजी संचालक पांडुरंग काळे यांनी तीस लाख लाख रुपये जमा केल्यानंतर बाकीच्या उर्वरित गटांतील सभासदांची बैठक घेऊन निधी गोळा करणे तसेच निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येत आहेत नुकतीच गट क्रमांक चार मधील सभासदांची बैठक पार पडली यावेळी अकरा लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.त्यामुळेच यशवंतचे गतवैभव पुन्हा पूर्वपदावर येणार याबाबत शुभ संकेत मिळत असल्याचे एकंदरीत सभासदांच्या सहकार्यातून दिसून येत आहे.

हवेलीतील मांजरी बुद्रुक येथील के.के.घुले महाविद्यालयात या ठिकाणी यशवंत सहकारी साखर कारखाना लि. थेऊर पंचवार्षिक निवडणुकी संदर्भामध्ये (गट क्र.4) मधील सभासदांची बैठक पार पडली

यात कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात एकमताने संमती देण्यात आली .

माजी संचालक पांडुरंग काळे यांनी निवडणूक घेण्यासंदर्भात तीस लाख रुपयांचा जो निधी कारखाना खात्यामध्ये जमा केला त्या संदर्भात सर्व उपस्थित सभासदांनी त्यांचे आभार मानले तसेच यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात जो अतिरिक्त निधी लागणार आहे त्या संदर्भात चर्चा झाल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी शिवराज घुले माजी सरपंच मांजरी व मल्हार कुंजीर यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश ताबडतोब पांडुरंग काळे यांच्याकडे सुपूर्द केला .तसेच उपस्थित मधील प्रामुख्याने दिलीप तुपे ,सुरेश घुले , राजीव शिवाजीराव घुले , अॅड.शहाजी मगर, निलेश मगर , प्रदीप रामदास मगर यांनी प्रत्येकी एक लाख रुपये देण्याचे जाहीर केले तर संपूर्ण फुरसुंगी गावाच्या वतीने तीन लाख असा एकूण 11 लाख रुपये च्या निधीची तरतूद या ठिकाणी करण्यात आली

असून या बैठकीस प्रमुख्याने गोपाळ अण्णा म्हस्के , अनिल रतन तुपे , नंदू घुले , शिवाजी केरबा कामठे , गेनबा पंढरीनाथ खुटवड, दिनकर साधू हरपळे, अनिल रामचंद्र टिळेकर, राहुल ज्ञानदेव चोरघडे, युवराज शेवाळे, मधुकर घुले, रमेश किसनराव ढोरे, डॉक्टर शिवदीप उंद्रे, शैलेश अरुण बेल्हेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

सूत्रसंचालन रंगनाथ कड यांनी केले व आभार अण्णासाहेब गणपत काळभोर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *