पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] लोणी-काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील धुमाळमळा येथे घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन भरदिवसा घरफोडी करून सोन्याच्या दागीन्यासह रोख रक्कम पळविली होती या घरफोडीसह अन्य चार गुन्ह्याची उकल करण्यात लोणी-काळभोर पोलीसांना यश आले असून या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

लोणी-काळभोर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी हद्दीतील धुमाळमळा परिसरात राहणारे मंदार धुमाळ यांच्या घरात भरदिवसा घरात कोणी नसताना घरफोडी करून नव्वद हजार रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी पळवला याबाबतची तक्रार लोणी-काळभोर पोलीसात दाखल करण्यात आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांना या गुन्ह्याची उकल करण्याच्या सूचना दिल्या.

तपास पथकातील पोलीस नाईक सुनील नागलोत आणि पोलीस शिपाई दीपक सोनवणे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, दिवसा घरफोडी करणारे दोघेजण कवडीपाट टोलनाक्यावर पल्सर गाडीवर फिरत आहेत त्यांचे संपूर्ण वर्णन कळवल्यावर तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे व त्यांचे पथक तेथे सापळा रचुन त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांची नावे 1) जलसिंग रजपूतसिंग दुधानी रा.अंधशाळेच्यामागे रामटेकडी,हडपसर 2) हुकूमसिंग रामसिंग कल्याणी रा.रामटेकडी बसस्टॉप शेजारी,हडपसर असे असल्याचे सांगितले.त्यांच्याकडून लोखंडी चाकू,पाठीवरील बॅगमध्ये दोन लोखंडी कटावणी एक चिमटा तसेच त्यांच्या ताब्यातील पल्सर मोटारसायकल शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरून आणल्याचे कळले.

त्यांच्याकडे घरफोडी संदर्भात चौकशी केली असता तसेच अन्य गुन्ह्यासंदर्भात अधिक तपास केल्यानंतर इतर चार गुन्हे उघडकीस आले त्यांच्याकडून 3 लाख,82 हजार रुपयांची सोन्याची दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

ही कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे पोलीस हवालदार सतिश सायकर,सुदर्शन बोरावके,पोलीस नाईक सुनील नागलोत, श्रीनाथ जाधव, पोलीस शिपाई दीपक सोनवणे,शैलेश कुदळे,बाजीराव वीर, चक्रधर शिरगिरे,महिला पोलीस शिपाई विश्रांती फणसे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *