पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] बोरी (ता.दौंड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता मंगेश भोसेकर यांची नुकतीच बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी भानुदास येडे यांनी जाहीर केले, माजी सरपंच जीवन पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली. या निवडीनंतर सरपंच सविता भोसेकर यांनी सांगितले की, गावच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार तसेच पर्यावरण विषयक उपक्रम वयावे राबविणार.यावेळी उपसरपंच दत्तात्रय शेलार, माजी सरपंच जीवन पवार, प्रगती गायकवाड, माजी सरपंच गणेश दौंडकर, शुभांगी भारती, रुपाली गोटे प्रज्ञा गायकवाड, महादेव यादव, शुभांगी गायकवाड, महादेव कुदळे, अंकुश कोतवाल आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग चे वृक्षप्रेमी व शिंदेवाडी चे माजी उपसरपंच प्रभाकर जगताप, संतोष शिंदे(ग्रामपंचायत सदस्य शिंदेवाडी) संतोष लवांडे, मनोहर कुंभारकर, सतीश कोंडे, विजय थोरात, संतोष पिगले, संजय टकले, नाना थोरात, अनिल मोरे ब अमित कुकोलोळ हिंगणगाव जिल्हा परिषद 1992 -93 ची सातवीच्या माजी विद्यार्थी यांच्यातर्फे त्यांचा पुणेरी पगडी व लक्ष्मीतरु भेट देऊन सन्मान केला.
