थेऊर [हवेलीनामा वृत्तसमूह] लोणी-काळभोर येथील एका तरुणाने अज्ञात कारणास्तव गळफास घेऊन आपल्या घरात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

आईवडील लग्नसमारंभानिमित्त बाहेरगावी गेल्यानंतर सुदर्शन ज्ञानेश्वर काळभोर या युवकाने घराचा दरवाजा बंद करुन गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाले.आईवडील बाहेर गेल्यावर सुदर्शनने दरवाजा बंद करून घेतले बराच वेळ तो घराबाहेर आला नाही त्यामुळे शेजारी राहणार्‍या दुकानदाराने दरवाजा वाजवला मोबाईलवर संपर्क केला तरीही त्यास प्रतिसाद मिळत नव्हता त्यानंतर त्याच्या पालकांना संपर्क करून याची माहिती दिली.रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ते घरी पोहोचले त्यांनी देखील आवाज देत दरवाजा वाजवला परंतु प्रतिसाद मिळत नाही हे कळल्यावर लोणी-काळभोर पोलीसांना याची माहिती देण्यात आली.पोलीस अमलदार अजिंक जोजारे घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा हतोड्याने तोडून दरवाजा उघडला असता आतल्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत सुदर्शन आढळून आला.

पुढील तपास लोणी-काळभोर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *