थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)  नायगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन व तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष कै सुभाष मुरलीधर चौधरी यांच्या स्मरणार्थ पतसंस्थेच्या वतीने पुणे ब्लड सेंटर हडपसर शाखा यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात परिसरातील ५२ जणांनी रक्तदान केले.

याप्रसंगी पतसंस्थेचे संस्थापक राजेंद्र चौधरी चेअरमन सुनील हगवणे,व्हाईस चेअरमन संजय कामठे, सरपंच गणेश चौधरी, सोपान खेडेकर,बिल्डकॉन कंपनी संचालक सोपान चौधरी, नंदू चौधरी, जालिंदर शिर्के,किरण गुळुंजकर, सोमनाथ खेडेकर, विशाल चौधरी, ग्रामपंचायत सदस्य सदस्य जितेंद्र चौधरी, उत्तम शेलार,नितीन हगवणे, कैलास चौधरी, कृष्णा चौधरी, नवनाथ गायकवाड,ज्ञानोबा शेलार, उत्तम घुले, पोपट चौधरी इत्यादी उपस्थित होते.

    मागच्या वर्षी पावसामुळे नुकसान झालेल्या
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे धनादेश तलाठी निवृत्ती गवारी,गावचे सरपंच तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले तसेच पुणे ब्लड सेंटरचे डॉक्टर व सर्व स्टाफ यांचा मान्यवरांच्या हस्ते पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *