पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) घोडेगाव पोलिसांनी अवैध दारू वाहतुक करणाऱ्यावर मोठी कारवाई करत  पाच लाख सात हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोन इसमास त्यांना दारू विक्री करणारा दुकानदार व जुन्नर येथील दारू खरेदी करणारा इसम या सर्वांना अटक करण्यात आले आहे.या पुढील काळात घोडेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने अवैद्य दारू बाबत कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असून जे शासन मान्य दारू विक्री करणारे दुकानदार आहेत त्यांनी चुकीच्या मार्गाने दारूविक्री करू नये अन्यथा त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात येणार असून सध्या सुरु असलेल्या कोरोना साथीच्या अनुषंगाने त्यांच्या अस्थापन  साथ संपेपर्यंत सील करण्यात येणार आहेत.
            घोडेगाव पोलिसांनी या प्रकरणी १) अशिष बबन पादरे वय ३१ वर्षे रा. सदा बाजार पेठ जुन्नर, ता.जुन्नर, जि.पुणे, २) विठ्ठल धर्मा पारधी वय ३३ वर्षे रा. गोळेगाव, ता.जुन्नर, जि.पुणे ३)उत्तम धोंडुशेट पादरे रा. सदा बाजार पेठ जुन्नर, ता.जुन्नर, जि.पुणे ४)जे.के.वाईन्स घोडेगाव चे मालक (नाव पत्ता माहित नाही ) या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत १) ९२१६०/-    रू किमतीच्या मँकडॉल नं १ कंपनीच्या 12 खाकी रंगाचे बॉक्स त्यामध्ये   एकुण ५७६  सिलबंद बॉटल्स, प्रत्येकी १८० मिली मापाच्या प्रत्येक बॉटलची   किम्मत रु.१६०.
२)   ७२००/- रू किमतीच्या इंपिरियल ब्ल्यु कंपनीच्या १ खाकी रंगाचे बॉक्स त्यामध्ये  ४८ सिलबंद बॉटल्स, प्रत्येकी १८० मिली मापाच्या,  प्रत्येक कॉटर्सची किंमत रु. १५०.
3)   ७६४०/-  किमतीच्या रॉयल स्टॅग कंपनीच्या १ खाकी रंगाचे बॉक्स मध्ये ४८ सिलबंद बॉटल्स, प्रत्येकी १८० मिली मापाच्या, प्रत्येक कॉटर्सची किम्मत  रु.१८०
 ४) रु.४०००००/- किमतीची एक मारूती सुझुकी कंपनीची सिल्वर रंगाची स्विप्ट डिझायर
 कार.असा एकूण रु. ५,०७,०००/-.मुद्देमाल जप्त करण्यात आला.
       घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्नर फाटा येथे मंचर ते भिमाशंकर रस्त्यावर अशिष बबन पादरे, विठ्ठल धर्मा पारधी  हे  सिल्वर रंगाचे स्विप्ट डिझायर गाडी नं. एम.एच.१२ के.एन. ३३६६ मध्ये बेकायदा बिगर परवाना विदेशी मॅकडॉल नं. कंपनीचे चे १२ बॉक्स त्यामध्ये १८० मिली मापाच्या ५७६ बॉटल्स ,  इंपिरियल ब्ल्यु  कंपनीचे १ बॉक्स मध्ये १८० मिली मापाच्या ४८ बॉटल्स, रॉयल स्टॅग कंपनीचे १ बॉक्स मध्ये १८० मिली मापाच्या ४८ बॉटल्स असा रु.१,०७,००० किमतीचा माल घेऊन उत्तम धोंडुशेट पादरे यांच्या सांगण्यावरून जे.के.वाईन्स नावाचे घोडेगाव येथील वाईन शॉप मधुन घेवुन वाहतुक करीत होते त्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आले.
           पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फौजदार वायाळ करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *