पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] जलजीवन मिशन या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेत जिल्ह्याला राज्यात अग्रकम्रावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी जिल्ह्यातील प्रलंबित कामांबाबत कृती आराखडा तयार करून प्रलंबित कामे मिशन मोडवर पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील बंद पडलेली कामे पुन्हा जोमाने सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

         जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, ग्रामीण पाणीपुरवठा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ यांच्यावर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले, जलजीवन मिशन ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणेच सर्व कामे करावीत, संबंधित अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय पातळीवर सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी पाहणी करावी. मान्सूनच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता ग्रामीण भागात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मोहिमेअंतर्गत करण्यात येणारी कामे वेळेत पूर्ण करावीत.

अभियानातील कामासाठी जलसंपदा, महसूल, वन, रेल्वे आणि इतर विभागाकडील जागेच्या प्रलंबित भूसंपादनाचे प्रस्ताव मार्गी लावावेत. प्रलंबित सरकारी दिल्या. जागांबाबतचे प्रस्ताव जिल्हा शालिनी परिषदेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी माहितीचा पाठवावेत. कामे पूर्ण करताना पाणी व कामांच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, जिल्ह्यात १ हजार २२४ पाणीपुरवठा योजना मंजूर असून १ हजार १३६ योजनांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. १ हजार २१ योजनांची कामे सुरु झाली आहेत. जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारच्या विविध प्रकल्पातंर्गत रस्ते आदी कामे सुरु असून, पाणीपुरवठा योजनांची कामे करताना या बाबीचाही विचार करावा. कामे करताना प्रशिक्षित मनुष्यबळाचा वापर करावा. कंत्राटदारांनी मे महिनाअखेर दिलेली कामे पूर्ण करावीत. यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आढावा घेण्यांच्या सूचना त्यांनी

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *