थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) किरण लक्ष्मण शिंदे यांची राष्ट्रीय विमुक्त भटक्या जनजाती महासभेच्या राष्ट्रीय महिला सरचिटणीस म्हणून काम केल्यानंतर त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची महासभेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यांना निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष श्रीपाल सिंह नायक यांच्याकडून मिळाले आहे.
किरण शिंदे या पेशाने शिक्षिका असून त्या गेली अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रमात सक्रीय असतात.विशेषतः भटक्या विमुक्त जातीजमातीसाठीचे त्यांचे कार्य मोठे आहे.त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, बालविवाह, प्रौढ साक्षरता यासाठी जनजागृती केली तसेच महिला बचत गटाची निर्मिती, शैक्षणिक दत्तक पालक योजना, कॅन्सर जनजागृती, बेटी बचाव बेटी पढाव, महिला व तरुणींसाठी मोफत स्व संरक्षण मार्गदर्शन यासह वृक्षारोपण या सारखे पर्यावरण विषयक कार्यक्रम राबवले.
या निवडीनंतर शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,भटक्या विमुक्त जमाती मधील महिलांचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत त्यावर राष्ट्रीय स्तरावर संघटन उभारुन कार्य करणार आहे.शासनाच्या विविध योजना या महिलांपर्यंत पोहोचविण्याचे काम करणार असल्याचे सांगितले.
