पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) प्रति चिंतामणी गणपती मंदिर ,पिरंगुट, ता. मुळशी ,जि.पुणे
पिरंगुट येथील गणपती अष्टविनायका पैकी एक थेऊर येथील चिंतामणी गणपती चे प्रतिरुप आहे.यास प्रतिचिंतामणी संबोधले जाते.गणपती सिध्दी बुद्धीसह विराजमान आहे.माधवराव पेशवे हे थेऊर येथील चिंतामणी चे भक्त होते. त्यांनी आपल्या अंत: काळात थेऊर येथून स्वराज्याचा कारभार पाहीला. येथे त्यांनी राहून गणपतीची सेवा व पुजा-आर्चा केली. आखेरचे दिवस त्यांना गणपतीच्या सहवासात घालवायचे होते.
त्या आधी या गणपतीची पुजा आर्चा महानसाधू मोरया गोसावी यांचे वंशज देव कुटूंबीय पाहात होते.
माधवराव पेशवे यांना गणपतीचा सहवास लाभावा या साठी हे देव कुटूंबीय पिरंगुट ला आले व यथे स्थायिक झाले. पिरंगुट येथे तेथील गणपतीची सेवा करू लागले.
माधवराव पेशव्यांनी पिरंगुट येथील गणपती मंदिराचा जीर्णोध्दार केला व ३६ गावाचा मिळणारा महसूल त्यांनी या गणपतीच्या खर्चा साठी व देव कुटूंबीयांसाठी दिला.
देव घराण तेव्हा पासून या चिंतामणीची सेवा करीत आहे.हा गणपती सर्वांचा लाडका व मनोकामना पुर्ण करणारा आहे.
मंदिर पुर्वाभिमुख असून गणपती समोर उंदिरमामा आहेत. सभामंडपात कासव तर गाभ-यात श्रीगणेश विराजमान आहेत. मागे चांदीची प्रभावळ आहे.मंदिर २००९ ला जिर्णोध्दार केला असून करवीर पिठाचे शंकाराचार्य यांच्या हातून कलश स्थापना झाली आहे.मुख्य गणपती देवस्थान च्या देखरेखी खाली येथील प्रथा परंपरा पाळल्या जातात.परंपरे प्रमाणे चिंचवड च्या गणपतीची पालखी मोरगावच्या मयुरेश्वराला तर पिरंगुटच्या गणपतीची पालखी थेऊरच्या चिंतामणीला जाते.आरतीला गणपतीची पद म्हंटली जातात.या मंदिराचे विश्वस्त देव घराण असून या गणपतीची पुजा आर्चा श्री गणपती देवस्थान ,पिरंगुट यांच्या तर्फे केली जाते.मंदिराचे मुख्य विश्वस्त शशांक देव आहेत .प्रसिध्दी पासून दुर असलेला हा गणपती भक्तांचा मनोकामना पुर्ण करणारा आहे.
.
साभार ( पेंडसे गुरूजी)
