कदमवाकवस्ती (हवेलीनामा ऑनलाइन)   पुणे सोलापूर महामार्गाचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्गीकरण झाल्यानंतर याकडे या विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे त्यामुळे यामार्गावर गेल्या काही दिवसात अनेक समस्या उद्भवतात महामार्गाच्या दोन्हीही बाजूस अस्ताव्यस्त वाढलेली झुडुपे रस्त्यावर जमा झालेला चिखलाचे खच आणि आता रस्त्यावरील खड्यांची भर पडली आहे असाच एक अपघातास कारणीभूत ठरू शकेल असा मोठा खड्डा कदमवाकवस्ती येथिल इंडियन आँयल कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रस्त्याच्या मधोमध पडला होता.रस्त्यावरील वाहनांची वर्दळ पाहता सणासुदीच्या काळात नक्कीच मोठया अपघातास कारणीभूत ठरला असता परंतु याच परिसरात सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असलेल्या जयहिंद याची दखल घेऊन लोणी काळभोर शहर वाहतूक शाखा यांच्या सहकार्याने तो खाडी वाळू व सिमेंट च्या मिश्रणाने भरून काढला.

         पोलिसांबद्दल नेहमीच सर्वसामान्य जनतेत वेगळीच भावना असते परंतु त्यांच्याकडेही सामाजिक बांधिलकी असते व प्रसंगी ते कार्यात सहभागी होऊन आपले कर्तव्य पार पाडतात हे आजच्या प्रसंगावरून पुढे आले आहे. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे पोलीस नाईक गणेश मधुकर गोसावी व अनिल गायकवाड तसेच पोलीस शिपाई महेश मडके यांनी मोठे सहकार्य केले.
           या कामाचे कौतुक करताना हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस उपायुक्त कल्याणराव विधाते यांनी जयहिंद ग्रुपच्या कार्यकर्त्यांच्या कार्याबद्दल गौरव उद्गार काढले तर पोलिसांनी केलेल्या कामाबद्दल नागरिकांकडून शाबासकी मिळाली तर त्यांचा काम करण्यास आणखी उत्साह वाढतो असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *