पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने किल्ले तोरणा गड स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती या मोहिमेमध्ये स्वराज्य संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब दिघे सहसचिव राजेश कान्हूरकर राज्य विस्तारक सचिन कारले ,राज्य संपर्कप्रमुख सचिन उढाणे ,पुणे जिल्हा सल्लागार संतोष गावडे, तसेच धाराशिव जिल्ह्यातील संघाचे कार्यकर्ते धीरज शिंदे गौतम इंगळे गणेश सावळकर अशोक चौरे दीपक स्वामी हे यात सहभागी झाले होते.

या मोहिमेत १० पोती भरून प्लॅस्टिकच्या बाटल्या, व प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आला.गोळा करण्यात आलेला कचरा वेल्हे गावचे सरपंच संदीप नगीने यांच्याकडे सुपूर्द केला.सरपंचानी या कचऱ्याचे ग्रामपंचायत मार्फत विल्हेवाट लावण्याची जबाबदारी घेतली.त्यासोबत च दिवाळी नंतर पर्यटक येथे पर्यटनासाठी येतात त्यावेळी असा कचरा वाढण्याची शक्यता असते त्यासाठी चेक पोस्ट उभारून प्लॅस्टिक बाटली व प्लॅस्टिक पुड्यासाठी अनामत जमा करून घेणार व पुन्हा त्या बाटली व पुड्या चा कचरा दाखवून अनामत परत देणार असा मानस बोलून दाखवला.
स्वराज्य संघ ,महाराष्ट्र राज्य तर्फ सर्व दुर्गप्रेमी व हौशी पर्यटकाना आवाहन करण्यात येते की गडावर प्लॅस्टिक कचरा करू नये.गडाचे पावित्र्य व निसर्ग च सौंदर्य अबाधित ठेवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *