थेऊर (हवेलीनामा) पुणे शहरातील दोन दिवसाच्या मुक्कामानंतर एकादशी दिवशी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा लोणी काळभोर मुक्कामी पोहोचला आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी उपवास सोडून हा सोहळा यवतच्या मुक्कामाकडे सकाळी ७:३० वाजता मार्गस्थ झाला.लोणी काळभोर मधील सामाजिक संस्था, तरुण मंडळ तसेच काही वैयक्तिक नागरिकांनी वारकऱ्यांच्या चहापानाची व फरळाची सोय केली होती आणि उपवास सोडण्यासाठी देखील म्हाप्रसादाची व्यवस्था केली होती.

पुणे सोलापूर महामार्गवरील माळीमळा येथे भाविकासाठी चहा नास्ता याची सोय केली होती. पुढे कुंजीरवाडी गावच्या हद्दीत बोरकर वस्ती येथे स्वागत झाले तर थेऊरफाटा येथे थेऊर ग्रामपंचायतच्या वतीने प्रशासक सरपंच शितल काकडे, अप्पासाहेब काळे आणि ग्रामपंचायत प्रशासकीय मंडळातील सदस्यांनी स्वागत केले भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. सुमित कुंजीर युवा मंच थेऊर यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी पाणी व अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती यावेळी माजी उपसरपंच विलास कुंजीर, दत्तात्रय कुंजीर व अनेक मित्र वर्ग उपस्थित होते. पांडव प्रतिष्ठानचे वतीने तीन हजार भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी टकाभाऊ राखपसरे, विकास कांबळे,गणेश साठे, रोहित कांबळे आणि माऊली राखपसरे श्रीनाथ पतसंस्थेच्या वतीने वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे चेअरमन संदीप धुमाळ, कुंजीरवाडीच्या माजी सरपंच सुनीता धुमाळ, माजी सरपंच सचिन तुपे, युवा सिद्धांत तुपे, संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते.

कुंजीरवाडी येथे प्रशासक हरेश गोठे यांनी स्वागत केले यावेळी ग्रामविकास अधिकारी सविता भुजबळ आणि प्रशासकीय मंडळ उपस्थित होते. तसेच मोरया वन हॉस्पिटल आणि रामकृष्णहरि संस्थेचे चेअरमन तात्यासाहेब काळे व्हाईस चेअरमन विजय कुंजीर आणि संचालक मंडळ उपस्थित होते. हवेली तालुका पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे व मित्र मंडळ यांच्या वतीने भक्तांसाठी मोफत औषधोपचाराची सोय केली होती. माजी सभापती चंद्रभागा काकडे यांच्या वतीने वारकऱ्यांना फराळ वाटप करण्यात आला. यशवंत उद्योग समूहाचे अध्यक्ष नवनाथ काकडे यांच्या वतीने वारकऱ्यांना मोफत मसाज सेवा देण्यात आली.

शासनाच्या नगर विकास, गृह, महसूल आणि आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी सेवेसाठी तत्पर होते. आरोग्य विभागाच्या लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य अधिकारी डॉक्टर महबूब लुकडे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कुंजीरवाडी च्या आरोग्य अधिकारी लोखंडे आणि समुदाय आरोग्य अधिकारी यांनी विविध ठिकाणी वारकऱ्यांच्या सोयीसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली.

 

 

 

जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभागाचे या वर्षी वारीसाठी “नवभारत साक्षरता अभियान प्रचार आणि प्रसार”हे विशेष उद्दिष्ट होते.या अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तारमळा -थेऊर या शाळेने थेऊर फाटा ते कुंजीरवाडी असा प्रवास तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होऊन केला.शाळेने मानवी वाचनालय हा अभिनव उपक्रम राबविला.विठ्ठल रखुमाई आणि विविध संतांच्या वेशभूषा करून दिंडी निघाली आणि सर्वांगावर शब्दलेखन करून सहभाग घेतलेल्या मुलांना पाहून प्रत्येक वारकरी क्षणभर थांबून मुलांकडे पाहत होता. बालवयातील या वारकऱ्यांना साक्षर स्वरूपात पाहून सहभागी वारकऱ्यांनी याचा आनंद घेतला.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *