थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) दिवाळी सण दोन वर्षानंतर देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पंरतू आजही देशात काही समाज या सणांपासून वंचित आहे सण साजरे करायचे सोडा त्यांना एकवेळ जेवण मिळण्याची चिंंता असते.दिवाळीत लहान मुलासह तरुणांनी दिवाळीत फटाक्याची आतिशबाजी करुन चिवडा लाडू खाऊन साजरी केली तर एकीकडे नवनाथ यांनी दगडालाचा आपले फटाके बनवत छन्नी हातोडीने दगड घडवले त्यामुळे “अरे संसार संसार आधी हाताला चटके मग मिळते भाकरं”या एका चिञपटातील गाण्याचा प्रत्यय आला असे एक वडार कुंटुंब थेऊरमध्ये आपल्या परिवार सह दाखल झाले दगडापासून जाते,उखळ, पाटा, वरवंटा, खलबत्ता आदी वस्तु घडवून वडार समाज आपली उपजीविका भागवत आहेत श्रीक्षेञ थेऊर येथे दहा दिवसापूर्वी जालना जिल्ह्यातील जाहफराबाद येथील एक वडार समाजाच कुंटुंब आपल्या तीन लहान मुलासह कुंटुंबाची उपजिका भागवण्यासाठी थेऊर येये मुक्कामी आले विज्ञानाच्या युगात अनेक शोध लागल्यामुळे कामे झटपट होतात त्यामुळे अनेक घरातून हाॕटेल मध्ये इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर वाढला असल्यामुळे दगडापासून बनवलेल्या पांरपारिक वस्तूकडे दुर्लक्ष होत गेले याची मागणी अत्यंत दुर्मिळ झाल्यामुळे या वस्तूंना बाजारात फारशी मागणी नसल्याने हा समाज उपेक्षित राहत आहे, सर्वांना लाभ मिळावा म्हणून शासन प्रयत्न करीत असले तरी आजही हा समाज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे लहान मोठ्या दगडांना आपल्या भोवती घेवून कधी ग्राहकाची वाट पाहत तर कधी छन्नी आणि हातोड्याने दगडांना आकार देत बसलेले दिसतात. लोणी काळभोरच्या
दगड घडवणारे आणि दगड काढून फोडणारे ट्रकमधून आणले आहे. खाणीतून दगड कोणत्या दगडापासून कोणती वस्तू घडवता वडार, तर दगडापासून अशा वस्तू घडवणारे काढतानाच ते विशिष्ट आकाराचे काढले येईल याचा अंदाज घेवून दगड निवडले कठीणता पाहून कोणता दगड योग्य आणि व्यक्त केली.दगडाला आकार देणारा वडार समाज उपेक्षितच कोणता दगड अयोग्य ठरवले जाते. जो दगड मऊ म्हणजे घडवायला सोपा तो कमजोर तर कड़क म्हणजे घडवावला कठीण असणार्या
दगडापासून केलेल्या वस्तू अधिक काळ टिकतात, अशी माहिती जालना येथील नवनाथ मोहिते व त्यांच्या पत्नीनी दिली.नवनाथ आणि त्यांचे कुटुंब येथे दगडांना छन्नी आणि हातोड्याने आकार देऊन उखळ, पाटा वरवंटा, खलबत्ता या गृहोपयोगी तयार करुन त्याची विक्री करण्यासाठी आजूबाजूच्या गावात गाढवाच्या सहाय्याने वाहतुक करत फेरी मारतात तर नवनाथ दिवसभर हातात छन्नी हातोडी घेऊन दगडाला आकार देण्याचे काम करतात दगड घडवणे खूप कष्टाचे आणि वेळखाऊ काम असते. एक जाते घडवायला ८ ते १०दिवस लागतात. उखळ आणि खलबत्ता एक-दोन दिवसांत होतो. एका जात्याची किंमत रु. ७०० पासून ८०० पर्यंत,
उखळाची ५०० पर्यंत तर खलबत्ता रु.
३०० रुपयांपर्यत विकला जातो परंतु तयार केलेल्या मालाची विक्री झाली नाही तर उपासमारी होते नवनाथ यांनी बोलताना सांगितलं पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकंती करावा लागते यात मुलांना शाळा शिकायला मिळत नाही मी आणि माझी पत्नी दोघेही शाळा शिकलो नाही रोज अठवडायला नवीन गावात जाऊन पाल ठोकून राहावा लागत ऊन वारा पाऊस थंड अंगावर घेत पोटासाठी काम कराव लागत आम्ही कसला आला सणवार गोडधोड जेवण चटणी भाकरी खाऊन दिवस काढायचा यावेळी त्यांना कोरोना लस घेतली का असे विचारले असता त्यांनी सांगितले दोन्ही डोस घेतले
