राजगुरूनगर (हवेलीनामा ऑनलाइन) हॉटेलमध्ये झालेल्या किरकोळ वादातून ४२ वर्षीय व्यक्तीची धारदार हत्याराने चुलत भावानेच चालत्या दुचाकीवर गळा कापून हत्या केल्याची धक्कादायक घटना किवळे (ता. खेड ) येथे घडली आहे. रमजान आदमभाई शेख (रा.किवळे, ता. खेड )असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नांव आहे. याप्रकरणी संशयीत आरोपी रफिक पमा शेख (रा.आहिरे, ता. खेड ) याच्याविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत सुदाम शिवले (वय ३६, रा. किवळे, ता. खेड ) व मृत रमजान शेख तसेच संशयीत आरोपी रफिक शेख हे शनिवारी (दि. ११) दुपारी पाच वाजता शिवले याच्या मोटारसायकलवरुन तीघे बसून चांदूस येथे जात होते. पाईट ते शिरोली रस्त्यावर एका पोल्ट्रीफार्मच्या रस्त्यादरम्यान रमजान शेख व रफिक शेख यांच्यामध्ये हॉटेलमध्ये झालेल्या वादातुन रफिक शेख याने धारदार हत्याराने रमजान शेख यांच्या गळ्यावर चालत्या मोटारसायकलवरच वार करून गंभीर जखमी केले. गळ्याला गंभीर जखम झाल्याने रमजान शेख यांचा जागीच मुत्यू झाला. यादरम्यान रफिक शेख चालत्या मोटरसायकलवरून उडी मारून पळून गेला. या घटनेबाबत चंद्रकांत सुदाम शिवले यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रफिक शेख हा फरार झाला असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल लाड करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *