पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] पूर्व हवेलीतील फुरसुंगी आणि उरुळी देवाची नियोजित नगर परिषदेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाला फुरसुंगी ग्रामस्थांनी तिवृ विरोध केला असून आमच्या गावांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने विकास केवळ महापालिकाच करू शकते त्यामुळेच दोन्ही गावे पुणे महापालिकेतच ठेवावीत. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात निषेध नोंदवत न्यायालयात जाणार आहोत,’ अशी भूमिका फुरसुंगी ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत मांडली.

फुरसुंगी नागरी कृती समितीतर्फे भेकराई येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजी पंचायत समिती सदस्य शंकर हरपळे, माजी पंचायत समिती सभापती दिनकर हरपळे, माजी नगरसेवक गणेश ढोरे, माजी सभापती अनिल टिळेकर, माजी उपसरपंच संजय हरपळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल हरपळे, माजी ग्रामपंचायत सदस्य राजू होले, राहुल चोरघडे, सुहास खुटवड, अमित हरपळे, नितीन काळे, किरण हरपळे, किरण सरोदे, सागर हरपळे, अप्पा कसबे आदी उपस्थित होते. या वेळी ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्याच्या निर्णयावर घोषणा देत निर्णयाला विरोध केला आहे.मुळात दोन्ही गावे महापालिकेमध्ये गेल्यानंतर महापालिकेने वाढवलेला मिळकतकर कमी करावा व मूलभूत सुविधा द्याव्यात, अशी सर्व नागरिकांची मागणी होती. मात्र, ही कारणे पुढे करून थेट वेगळी नगर परिषद निर्माण करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत नागरिक नाराज आहेत. ‘जनमत चाचणी करावी’आणि मगच निर्णय घ्यावा अशी भूमिका यावेळी स्पष्ट केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *