पुणे [हवेलीनामा वृत्तसमुह] मावळ तालुक्यातील शिरगावचे सरपंच प्रवीण साहेबराव गोपाळे यांची शनिवारी प्रती शिर्डी साईबाबा मंदिरासमोर कोयत्यासारख्या धारधार शस्त्राने वार करून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपींना अटक केले. अटक केलेल्यामध्ये महेश भेगडे, अशोक कांबळे, मनिष ओव्हाळ, अमोल गोपाळे यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी भाऊ प्रवीण यांच्या हत्येप्रकरणी स्थानिकांवर संशय व्यक्त केला आहे. प्रवीण हे त्यांची दुचाकी घेऊन प्रति शिर्डी साईबाबा मंदिराच्या कडेला बसले होते. त्यावेळी दोन आरोपीेंनी येऊन त्यांची पाहणी केली त्यानंतर इतर दोन आरोपी दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी फिर्यादी यांच्यावर कोयत्यासारख्या हत्याराने वार करून खून केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *