मुंबई [हवेलीनामा वृत्तसमुह] विधान सभेत अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेल्या महिलांना एसटी मधून अर्ध्या तिकीटावर प्रवास सवलत येत्या एप्रिल महिन्यापासून देण्यात येणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक सवलती घोषित केल्या यामध्ये सर्व महिलांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मधून निम्म्या तिकीट दरात प्रवासाची सवलत देण्यात येणार आहे अशी घोषणा केल्यानंतर याची अंमलबजावणी कधी होणार याचे उत्सुकता महिला वर्गात होती ही सवलत एप्रिल पासून लागू होणार असल्याची माहिती मिळत आहे.

आम्ही नुसते बोलत नाही तर करुन दाखवतो याचीच प्रचिती असल्याची प्रतिक्रिया पुढे येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *