थेऊर [हवेलीनामा वृत्तसमूह] श्री संत बाळुमामा यांचा पालखी सोहळा क्रमांक 9 श्रीक्षेत्र थेऊर येथे गेली पाच दिवस मुक्कामी असून या कालावधीत थेऊर व परिसरातील असंख्य भाविकांकडून दर्शन व महाप्रसादासाठी दिवसरात्र मोठ्याप्रमाणात गर्दी केली आहे.
श्री संत बाळुमामा यांची आख्यायिका सर्वश्रुत असून भक्तांनी हा सोहळ्यात दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या.संपूर्ण गावकर्यांनी दर्शन महाप्रसाद भक्तिभावाने घेतला.तर गावातील महिला भक्तांकडून आपापल्या परिने प्रसाद तयार करून भंडाऱ्यात सेवा दिली.
श्रीसंत बाळुमामांच्या मेंढ्यांचा कळप क्रमांक नऊ पूर्व हवेलीतील वेगवेगळ्या गावामध्ये मुक्कामी होता.हा सोहळा थेऊर येथे मागील आठवड्यात गुरुवारी मुक्कामी पोहोचला.सहा दिवसाचा पाहुणचार घेऊन बुधवारी सकाळी पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे.यात संपूर्ण गावकर्यानी उत्साहात सहभाग घेतला.
