पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) अलीकडे दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने यावर प्रतिबंध घालण्याच्या सूचना वरीष्ठांनी दिले त्यावर हडपसर पोलिसांनी गणेशोत्सव काळात याकडे लक्ष केंद्रित केले व एकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण ११ दुचाकी जप्त केल्या.
हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड व पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर असताना पोलीस अंमलदार प्रशांत टोणपे,शाहिद शेख,रियाज शेख यांना एका बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक वाहनचोर सासवड रस्त्यालगत तुकाईदर्शन,भेकराई नगर, ग्लायडिंग सेंटर जवळ येणार आहे याची माहिती वरिष्ठांना देऊन त्याठिकाणी जाऊन त्या इसमास ताब्यात घेतले त्याची अधिक चौकशी केली असता त्याचे नाव यशदीप जयदेव कोंडार वय २२,भेकराई नगर,हडपसर मुळगाव कल्याण ईस्ट ठाणे असे सांगितले. त्याच्याकडे असलेल्या पॅशन प्रो गाडीबाबत चौकशी केली तर उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु नंतर सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या व त्याने वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या परिसरातून एकूण ११ वाहने चोरल्याचे मान्य केले.ती सर्व वाहने जप्त करून एकूण रु.४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम,पोलीस निरीक्षक(गुन्हे) राजू आडागळे व दिगंबर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड व पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे,गणेश क्षीरसागर,पोलीस नाईक गोसावी,प्रदीप राठोड,समीर पांडुळे,शशिकांत नाळे,सचिन जाधव,पोलीस शिपाई शाहिद शेख,रियाज शेख प्रशांत टोणपे,प्रशांत दुधाळ,निखिल पवार,सचिन गोरखे,सूरज कुंभार या पथकाने केली.
