पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत अलीकडे वाढ होत असून निर्ढावलेली पुरुषी मनोवृत्ती विकृत कृत्य करताना दिसत आहेत पुणे शहरातील दोन घटना ताज्या असताना शुक्रवारी साकिनाका येथे महिलेवर अत्याचार करून अमानुष कृत्य केले यात या महिलेची मृत्यूशी झुंज चालू होती अखेर आज ती मृत पावली.या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.आता ही केस शीघ्र न्यायालयात चालेल दोषींना शिक्षा होणार ! पण झालेले नुकसान कसे भरून येणार
दिल्लीतील निर्भया अत्याचार घटनेशी साधर्म असलेल्या या घटनेने राज्यातील प्रत्येक स्त्रीच्या मनात चीड निर्माण झाली आणि आशा प्रवृत्ती ठेचून काढल्या पाहिजेत अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.स्त्री अत्याचारासंदर्भात अनंत कायद्यात तरतुदी आहेत परंतु ही प्रक्रिया पूर्ण होताना बराच कालावधी निघून जातो कायद्याचा धाक राहिलेला नसल्याने अशा घटना वारंवार घडतात.आज पुन्हा पुणे व अमरावती येथे अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत.
पंचायत समिती सदस्य कावेरी कुंजीर यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, पुणे शहरातील दोन्ही घटना व मुंबईतील ही घटना यामुळे ही दोन्ही शहरे महिला व मुलींसाठी असुरक्षित वाटू लागले आहेत एक सांस्कृतिक राजधानी तर दुसरी देशाची अर्थीक राजधानी येथे देशाच्या वेगवेगळ्या भागातून मुली शिक्षण नोकरीसाठी येतात या घटनेनंतर मुलींच्या पालकांना मोठी भीती वाटत आहे.यावर पोलीस,शासन व नागरिक यांनी एकत्रित उभे राहून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.
कुंजीरवाडी गावच्या माजी सरपंच सुनीता धुमाळ यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत गुन्हेगाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे तसेच ती त्वरित कारवाई होऊन नराधमांना असे कृत्य करताना भीती वाटली पाहिजे.समाज माध्यमाच्या माध्यमातून अनेक नको असलेल्या गोष्टी लहान वयात मुलांवर विपरीत मनोवृत्ती निर्माण करण्यास मदत करीत आहेत त्यासाठी शासनाने यावर निर्बंध घातले पाहिजेत अशी मागणी केली.यआवर एकच जसा गुन्हा तशी शिक्षा हा सूर महिलांच्या प्रतिक्रियातून पुढे येतो आहे.
अँड.पूनम कांबळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ही विकृत मनोवृत्ती असून ती ठेचून काढली पाहिजे तर महिलांनी स्वयंसंरक्षण करण्यासाठी तयार असले पाहिजे.अपराध्याला लवकरात लवकर शिक्षा झाली तर नक्कीच या प्रवृत्तीला आळा बसेल.
