थेऊर [हवेलीनामा वृत्तसमूह] हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेला अंदाज खरा ठरवत आज सायंकाळी होळी पौर्णिमेस विजांच्या कडकडाटासह थेऊर व परिसरात पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली.पूर्वी याकाळात पाऊस हजेरी लावत असे याची शेतकरी वर्गात कल्पना असायचीच ज्यावेळी हवामान खात्याकडून अंदाज मिळणे अवघड होते तेव्हा देखील या अवकाळी पावसाच्या आगमनच्या प्रचलित वेळा ठरलेल्या असतच.

गेली दोन दिवसापासून राज्याच्या उत्तर विभागात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले हवामान खात्याकडून याची कल्पना देण्यात आली होती.यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच केळी उत्पादक शेतकरी देखील चिंतेत पडला.काल नाशिक जळगाव धुळे या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.

आज दिवसभर तशी पावसाचे चिन्ह दिसत नव्हते परंतु संध्याकाळी साडेसहा नंतर ढगांची दाटी झाली आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.वारा किंवा मोठा पाऊस नसूनही विज पुरवठा मात्र खंडीत झाला त्यामुळे होळीच्या सणाच्या दिवशी अंधारात भोजन करण्याची वेळ आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *